शरद पवार यांचा 29 जुलैला सत्कार

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 23 जुलै 2017

औरंगाबाद - संसदीय कारकिर्दीस 50 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल माजी केंद्रीय कृषिमंत्री आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांचा येत्या शनिवारी (ता. 29) येथे नागरी सत्कार करण्यात येणार आहे. सत्कार सोहळा समितीचे अध्यक्ष नंदकिशोर कागलीवाल, कार्याध्यक्ष आमदार सतीश चव्हाण यांनी आज पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

देवगिरी महाविद्यालयाच्या प्रांगणात शनिवारी दुपारी तीनला कार्यक्रमाला सुरवात होईल. केंद्रीय मार्ग परिवहन व महामार्ग, नौकानयनमंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते शरद पवार यांचा नागरी सत्कार होणार आहे. सलग 50 वर्षे राज्याच्या आणि देशाच्या कायदे मंडळात कार्य केलेले शरद पवार हे एकमेव नेते ठरले आहेत. त्यांच्या कार्याची दखल घेऊन केंद्र सरकारने "पद्मविभूषण' देऊन गौरविले आहे. पाच दशकांत पवार यांच्या कार्यकाळात अनेक निर्णय झाले. प्रकल्प उभे राहिले. यात त्यांनी मराठवाड्याच्या विकासासाठीही पुढाकार घेतला असल्याचे आमदार चव्हाण म्हणाले.