बाल साहित्यिकांसाठी शिवार पुरस्कार योजना

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 3 ऑक्टोबर 2017

औरंगाबाद - महाराष्ट्रातील मुला-मुलींनी लिहिलेल्या व पुस्तकरूपाने प्रकाशित झालेल्या बाल साहित्याला "शिवार साहित्य पुरस्कार' दिला जाणार आहे. पाच हजार रुपये रोख, गुणवत्ता प्रमाणपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

या पुरस्कारासाठी लेखक, लेखिकेला आपले पुस्तक पाठविता येईल, अथवा अन्य कुणालाही पुस्तकाची शिफारस करता येईल. लेखक-लेखिकेचे वय 1 जानेवारी 2014 रोजी सोळा वर्षांपेक्षा अधिक नसावे. तसेच सबंधित पुस्तक 2014 पूर्वी प्रकाशित झालेले नसावे. एक नोव्हेंबरपर्यंत यासाठी पुस्तक पाठविता येईल. शिफारस करणाऱ्यांनी पुस्तके पाठविण्याची आवश्‍यकता नाही; मात्र पुस्तकाचा तपशील प्रेरणा संदीप दळवी (द्वारा ः रा. रं. बोराडे, शिवार, 17, विद्यानिकेतन कॉलनी, जालना रोड, औरंगाबाद) यांच्याकडे पाठवावा, असे आवाहन करण्यात आले आहे.