औरंगाबाद शहरात वाढले वाहनांचे ध्वनिप्रदूषण

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 15 डिसेंबर 2017

औरंगाबाद - शहरात गेल्या काही दिवसांत, वाहनांच्या कर्कश हॉर्नची आणि वाहनांच्या ॲसेम्बल्ड (बदल केलेले) सायलेंसरची टरटर वाढली आहे. कर्कश आवाजाचे प्रदूषण रोखण्यासाठी पोलिस किंवा वाहतूक विभाग दुर्लक्ष करत असल्याने जनसामान्यांची ही नवीन डोकेदुखी वाढली आहे. 

शहरात दिवसेंदिवस वाहनांची संख्या वाढत आहे, सध्या जिल्ह्यात दहा लाखांच्या जवळपास वाहने आहेत. त्यातील साठ ते सत्तर टक्के वाहने ही शहर व परिसरात आहेत. वाहनधारकांना निष्कारण हॉर्न वाजवण्याची सवय जडत आहे. गरज नसतानाही हॉर्न वाजवणाऱ्यांची संख्या प्रचंड आहे. याशिवाय कर्कश हॉर्न बसवून घेणाऱ्यांची संख्याही वाढत आहे.  

ट्रक, टेंपो, कंटेनर यासारख्या जड वाहनांमध्ये असलेले हॉर्न अगोदरच अधिक आवाजाचे असतात, तरीही चारचाकीच्या चालकांकडून कर्कश हॉर्न बसवून घेण्याचे प्रमाण पन्नास टक्‍क्‍यांपेक्षा अधिक आहे. याशिवाय शहरातील कार, जीप, ऑटोरिक्षा, दुचाकीचेही हॉर्न बदलून प्रेशर हॉर्न बसवून घेण्याकडे कल वाढला आहे. वाढत्या वाहनांच्या संख्येमध्येच हॉर्नचा कर्कशपणा वाढल्याने सर्वसामान्य नागरिकांना आवाजाच्या प्रचंड प्रदूषणाला तोंड द्यावे लागत आहे.

सायलेंसरचीही नवीन समस्या
बुलेट व हायस्पीड बाईक तसेच रिक्षांच्या मूळ सायलेंसरमध्ये बदल करून आवाजाची टरटर वाढवण्याची नवीन प्रथा रूढ होत आहे. अनेक बुलेटस्वार तर हौसेखातर मोठा खर्च करून बुलेटच्या सायलेंसरमध्ये बदल करून घेतात. अशी बदल केलेली बुलेट आवाजाने प्रत्येकाचे लक्ष वेधून घेते; मात्र अशा आवाजाच्या बुलेटने अनेकांना मोठा त्रास सहन करावा लागतो. बुलेटप्रमाणेच ऑटो रिक्षांच्या सायलेंसरची टिकली काढून टाकल्याने रिक्षाची टरटर वाढते, यामुळे रस्त्यावर जाणाऱ्यांचे लक्ष वेधले जाते; मात्र त्याचा त्रास सर्वसामान्यांना सहन करावा लागतो. अशी वाहने गल्लीबोळांतून जाताना तर घरातील लहान मुले, वृद्ध नागरिक आणि आजारी नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. 

‘सकाळ’ची मोहीम 
कर्कश हॉर्न आणि बदल केलेल्या सायलेंसरच्या आवाजाच्या प्रदूषणाच्या विरोधात सकाळने ‘हॉर्न बजाने की बिमारी’ ही मोहीम राबविली होती. या मोहिमेमुळे त्यावेळी पोलिस आणि परिवहन विभागाने तातडीने दखल घेऊन कर्कश हॉर्नच्या विरोधात कारवाई केली होती. आता पुन्हा अशाच मोहिमेची गरज निर्माण झाली आहे. 

Web Title: aurangabad marathwada news sound pollution growth in aurangabad city