विधानसभा अध्यक्षांनी करून दिली कचरा डेपो हटविण्याची आठवण

विधानसभा अध्यक्षांनी करून दिली कचरा डेपो हटविण्याची आठवण

औरंगाबाद - नारेगाव (मांडकी) येथील कचरा डेपो हटवण्यासाठी नागरिकांनी तीन महिन्यांची मुदत दिली होती; मात्र महापालिकेने अद्याप निर्णय घेतलेला नाही, ही बाब अत्यंत गंभीर आहे, असे पत्र विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी महापौर नंदकुमार घोडेले यांना दिले.

नारेगाव (मांडकी) येथील कचरा डेपो हटवण्यासाठी नागरिकांनी ऐन दिवाळीत तीन दिवस आंदोलन केले. सणासुदीच्या काळात शहराची कचरा कोंडी झाल्याने महापालिका पदाधिकाऱ्यांनी आंदोलनकर्त्या नागरिकांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला; मात्र आक्रमक झालेल्या नागरिकांनी दाद दिली नाही. श्री. बागडे यांनी याबाबत मध्यस्थी केल्यानंतर नागरिकांनी तीन महिन्यांत महापालिकेकडून कचरा डेपो हटविण्याची कार्यवाही केली जाईल, असे आश्वासन दिले होते; परंतु दोन महिन्यांचा कार्यकाळ उलटून गेला आहे; मात्र अद्याप महापालिकेकडून कचरा डेपो हटवण्यासाठी कार्यवाही करण्यात आलेली नाही. त्यामुळे ही बाब अत्यंत गंभीर आहे. 

कचरा डेपो हटवण्यासाठी महापालिकेने तातडीने जिल्हा प्रशासनाशी समन्वय साधून जागा उपलब्ध करून घ्यावी, तसेच घनकचरा प्रकल्प सुरू करण्याच्या दृष्टीने पावले उचलणे आवश्‍यक आहे. त्याकरिता मंत्रालयस्तरावरून हालचाली सुरू करण्यासाठी प्रयत्न करावे, असे पत्रात नमूद करण्यात आले आहे. विधानसभा अध्यक्षांचे पत्र प्राप्त होताच महापौरांनी तत्काळ घनकचरा विभागाची बैठक घेतली व तातडीने पर्यायी उपाययोजना करण्यासाठी पावले उचलण्याचे आदेश दिले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com