'ओणम'साठी नांदेडहून विशेष रेल्वेगाडी

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 31 ऑगस्ट 2017

औरंगाबाद - केरळचा प्रमुख सण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या "ओणम'साठी दक्षिण मध्य रेल्वेने "नांदेड ते एर्नाकुलम' अशी विशेष रेल्वेगाडी सोडण्याचा निर्णय घेतला आहे.

औरंगाबाद - केरळचा प्रमुख सण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या "ओणम'साठी दक्षिण मध्य रेल्वेने "नांदेड ते एर्नाकुलम' अशी विशेष रेल्वेगाडी सोडण्याचा निर्णय घेतला आहे.

ओणमसाठी केरळला जाणाऱ्या नागरिकांची संख्या मोठी असते. हा उत्सव पाहण्यासाठी जाणाऱ्या पर्यटकांची संख्याही लक्षणीय असते. म्हणूनच दक्षिण मध्य रेल्वेने या काळात नांदेड ते एर्नाकुलम ही पंधरा डब्यांची विशेष रेल्वे गाडी सोडली आहे. ही गाडी नांदेड येथून शुक्रवारी (ता. 1 सप्टेंबर) सकाळी सुटणार आहे.