दिवाळीत एसटीही करणार भाडेवाढ

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 18 सप्टेंबर 2017

औरंगाबाद - खासगी ट्रॅव्हल्सच्या पावलावर पाऊल टाकत एसटी महामंडळानेही ऐन दिवाळीत तब्बल दहा ते वीस टक्के भाडेवाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे ऐन सणासुदीच्या काळात प्रवाशांच्या खिशाला कात्री लागणार आहे. 

खासगी ट्रॅव्हल्स ऐन सणासुदीच्या काळात प्रवासी भाड्यांच्या बाबतीत मनमानी सुरू असते. ‘प्रवाशांच्या सेवेसाठी’ असे ब्रीद असलेल्या महामंडळाने सेवा करताना खिशाला कात्री लावण्याचे नियोजनही खुबीने केले आहे. सणासुदीच्या काळात प्रवाशांची संख्या वाढते, खासगी ट्रॅव्हल्सचालक मनमानी करून अडवणूक करतात, ही बाब हेरून एसटी महामंडळानेही भाडेवाढ जाहीर केली आहे. दिवाळीच्या काळात म्हणजे १४ ते ३१ ऑक्‍टोबर दरम्यान ही अतिरिक्त भाडेवाढी लागू असेल.