अंधेरी नगरी.. चौपट राजा!

औरंगाबाद - सिडको चौकात वाहनांचे चमकणारे दिवेच काय तो वाहनधारकांना आधार आहे. यामुळे चौकातून आणि उड्डाणपुलावरून प्रवास करणे जोखमीचे ठरत आहे.
औरंगाबाद - सिडको चौकात वाहनांचे चमकणारे दिवेच काय तो वाहनधारकांना आधार आहे. यामुळे चौकातून आणि उड्डाणपुलावरून प्रवास करणे जोखमीचे ठरत आहे.

औरंगाबाद - आपल्या ढिसाळ कारभारासाठी प्रसिद्ध असलेल्या औरंगाबाद महापालिकेने जालना रोडवरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांचा जीव एकप्रकारे धोक्‍यातच घातला आहे. अग्रसेन चौकापासून एपीआय कॉर्नरपर्यंतचे पथदिवे बंद असल्याने ‘अंधेरी नगरी... चौपट राजा’ असेच चित्र सिडको चौकात आणि शहरातील सर्वांत मोठ्या उड्डाणपुलावर आहे. 

औरंगाबाद शहराची लाईफलाइन असलेल्या जालना रोडवरील वाहने चालविणाऱ्यांची महापालिकेतर्फे जणू परीक्षाच घेतली जात आहे. दिवस लवकर मावळत असतानाच सायंकाळच्या वेळेला ‘बंपर टू बंपर’ वाहतूक असणाऱ्या जालना रोडच्या काही भागात पथदिवे बंद आहेत. त्यामुळे वाहने चालविणे कसरतीचे काम ठरू लागले आहे. अग्रसेन चौकापासून एपीआय कॉर्नर दरम्यानच्या रस्त्यावरील एकही पथदिवा सुरू नसल्याने सिग्नलवर थांबणाऱ्या आणि उड्डाणपुलावरून प्रवास करणाऱ्या वाहनांना अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. सिडको चौकात जालना, बीड आणि विदर्भातून येणाऱ्या बसगाड्या सिग्नलवर थांबतात. अपुरा प्रकाश या सिग्नलवर थांबणाऱ्या अन्य लहान वाहनांना यामुळे धोका निर्माण होतो. सिग्नल ओलांडून चालणाऱ्या पादचाऱ्यांची आणि लहान वाहनधारकांची अंधार असल्याने धांदल उडते आहे.

उड्डाणपुलावरील वाहनांचा वेग जास्त असतो आणि अचानक पथदिवे बंद असल्याचे दिसताच अनेक वाहनधारकांची समोरील वाहनांशी संभाव्य टक्कर रोखण्यासाठी त्रेधातिरपीट उडत असल्याचे चित्र सध्या आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com