सोशल मीडियात रमण्यापेक्षा अभ्यास करा

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 24 जुलै 2017

औरंगाबाद - व्हॉट्‌सॲप, फेसबुकसारख्या सोशल मीडियात रमण्यापेक्षा मन लावून अभ्यास करा, तो वाया जात नाही, असा प्रेमळ सल्ला मुख्य कार्यकारी अधिकारी मधुकर आर्दड यांनी रविवारी (ता. २३) विद्यार्थ्यांना दिला. 

संभाजी ब्रिगेडतर्फे राजर्षी शाहू भवनात आयोजित दहावी, बारावी, पदवी गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार सोहळ्यादरम्यान ते बोलत होते. व्यासपीठावर मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष डॉ. आर. एस. पवार, वैशाली खोपडे, वैशाली डोळस, भाऊसाहेब शिंदे, बार्टीचे विभागीय प्रकल्प संचालक श्रीकांत देशमुख, आर. एस. पवार, पी. आर. जाधव, पंढरीनाथ गायकवाड, शिवानंद भानुसे, प्रा. एल. अग्रवाल यांची उपस्थिती होती.

पुढे बोलताना श्री. आर्दड म्हणाले, की सध्या तरुण मुले व्हॉट्‌सॲपवर ‘सैराट’ झालेली दिसतात. त्याऐवजी अभ्यासात सैराट व्हा. कोणत्याही कामाचे नियोजन करतो त्याप्रमाणे अभ्यासाचेही नियोजन करा. पुस्तकी ज्ञानाबरोबरच अनुभवातून शिकणेही महत्त्वाचे असून यातूनच आपण घडल्याचे त्यांनी सांगितले. अभ्यासाव्यतिरिक्त अवांतर वाचनही करा, ज्ञान मिळवा. 

कार्यक्रमादरम्यान प्रा. एल. अग्रवाल यांनी करिअरच्या नव्या वाटा या विषयावर मार्गदर्शन केले. कार्यक्रमप्रसंगी दहावीच्या १२५ गुणवंत विद्यार्थ्यांचा, बारावीच्या ११० तसेच पदवी, सीईटीमध्ये प्रावीण्य मिळविणाऱ्या ७० विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.

 अध्यक्षस्थानी रमेश गायकवाड होते. विद्यार्थ्यांसोबत पालकांनीही कार्यक्रमाला उपस्थिती लावली होती. यावेळी पालकांचाही सत्कार करण्यात आला. आत्माराम शिंदे, विंग कमांडर टी. आर. जाधव, चंद्रकांत बनसोडे, रामदास गायकवाड, हेमाताई पाटील, सचिन मगर, राजू बोंबले, नामदेव बोरकर, राहुल बनसोड, अरुण गोर्डे उपस्थित होते.