अतिक्रमण हटविण्यावरून शहागंजमध्ये तणाव

औरंगाबाद - शहागंज भागात मंगळवारी महापालिकेच्या पथकाने अतिक्रमणे हटविली.
औरंगाबाद - शहागंज भागात मंगळवारी महापालिकेच्या पथकाने अतिक्रमणे हटविली.

औरंगाबाद - ड्रेनेजलाइनवर करण्यात आलेली अतिक्रमणे हटविण्यास विरोध करीत सुमारे दोनशे जणांचा जमाव जमल्याने शहागंजमध्ये मंगळवारी (ता. १२) काही काळ तणाव निर्माण झाला होता. एक अतिक्रमण वगळता इतर ठिकाणी हातोडा मारून महापालिकेचे पथक माघारी फिरले. 

शहागंज भागात दर्गा रोडवर ड्रेनेजलाइनवर सुमारे वीस टपऱ्या टाकून अतिक्रमण करण्यात आले आहे. महापालिकेला भूमिगत गटार योजनेअंतर्गत येथून लाइन टाकायची असल्यामुळे मंगळवारी दुपारी सी. एम. अभंग यांच्या नेतृत्वाखाली अतिक्रमण हटाव विभागाने कारवाई सुरू केली. सायंकाळी एका अतिक्रमणावरून काही काळ तणाव निर्माण झाला. संबंधिताने महापालिकेच्या पथकाला विरोध करत वाद घातला. पोलिसांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. 

दरम्यान, यासंदर्भात न्यायालयाने मनाई आदेश दिल्याने महापालिकेचे पथक माघारी फिरले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com