मराठा क्रांती मोर्चासाठी औरंगाबादेत दुचारी फेरी

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 2 ऑगस्ट 2017

औरंगाबाद - राज्यात लाखोंचे ऐतिहासिक मोर्चे काढूनही सरकारने मागण्यांकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे आता संतप्त मराठा समाजाने मुंबईत 9 ऑगस्टला क्रांतिदिनी मराठा क्रांती महामोर्चाची हाक दिली आहे. या पार्श्‍वभूमीवर जनजागृतीसाठी मंगळवारी शहरातून दुचाकी वाहन फेरी काढण्यात आली.

या फेरीत ट्रॅक्‍टरमध्ये शिवाजी महाराजांचा अर्धाकृती पुतळा ठेवला होता. त्यानंतर तरुणी, महिलांचा समावेश होता. त्यांच्यामागे युवक मंडळी, नागरिकांची दुचाकी वाहने होती. "एकच चर्चा, मुंबई मोर्चा', "ये रॅली तो झाकी है, मुंबई अभी बाकी है', अशा घोषणांनी रस्ते दणाणून सोडले. सर्व पक्षांतील मराठा नेत्यांनी, पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी या फेरीत सहभाग नोंदविला. कोपर्डी प्रकरणातील आरोपींना फाशी, शेतकरी आणि विद्यार्थी प्रश्‍न, मराठा आरक्षण या प्रमुख मागण्यांबाबत प्रत्येक जिल्ह्यातून इतर मागण्यांची निवेदने मागविण्यात येत आहेत. या एकत्रित मागण्या मुंबईतील मोर्चाद्वारे सरकारकडे केल्या जातील. मोर्चाचे नियोजन होण्यासाठी वेगवेगळ्या समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत.