जायकवाडीचा पाणीसाठा २१.६२ टक्के

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 18 जुलै 2017

ऊर्ध्व भागातून पाण्याचा विसर्ग सुरूच - नाशिक परिसरात समाधानकारक पाऊस

ऊर्ध्व भागातून पाण्याचा विसर्ग सुरूच - नाशिक परिसरात समाधानकारक पाऊस
औरंगाबाद - नाशिक जिल्हा परिसरात गेल्या चार दिवसांपासून जोरदार पाऊस पडत आहे. तेथील धरणात ५० टक्‍क्‍यांपेक्षा जास्त जलसाठा झाल्याने नांदूर-मधमेश्वर वेअरमार्गे गोदावरीच्या पात्रात सुरवातीला ३० हजार १६६ क्‍युसेक तर सोमवारी (ता. १७) १ हजार २६२ क्‍युसेक क्षमतेने पाणी दाखल होत आहे. गोदावरी दुथडी भरून वाहत असून रात्री उशिरापर्यंत जायकवाडीचा पाणीसाठा आता २१.६२ टक्‍क्‍यांपर्यंत पोचला आहे. एकीकडे मराठवाड्यात समाधानकारक पाऊस पडत नसताना किमान या धरणात पाणी येत असल्याचे काहीअंशी का होईना, आनंद व्यक्‍त केला जात आहे.

मराठवाड्यात ८५ टक्‍क्‍यांहून अधिक पेरणी झाली. मात्र, पावसाची स्थिती अजूनही चिंताजनक असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. चांगला पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्‍त केल्याने शेतकऱ्यांनी चांगली मशागत केली. जोमाने कामाला लागत पेरणी केली; मात्र नंतर पावसाने दगा दिला आहे. शेतकऱ्यांचे डोळे आकाशाकडे लागून आहेत. दुसरीकडे मराठवाड्यातील मोठ्या प्रकल्पांत असलेला पाणीसाठा वेगाने कमी होत आहे. 

दरम्यान, नाशिक जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडत असल्याने तेथील धरणे पन्नास टक्‍क्‍यांहून अधिक भरली आहेत. त्यामुळे जायकवाडीच्या दिशेने झेपावलेले पाणी शनिवारी (ता. १५) दुपारनंतर येऊन धडकले. गुरुवारी (ता. १३) जायकवाडी प्रकल्पात १७ टक्‍के पाणीसाठा होता; मात्र, जायकवाडीच्या ऊर्ध्व भागात जोरदार चांगला पाऊस होत असल्याने वेगाने येथे पाणी दाखल होत आहे. यामुळे लाभक्षेत्रात आनंदाचे वातावरण परसले आहे. खूप दिवसानंतर वरील धरणांतून पाणी दाखल होत असल्याने आनंदात आणखी भर पडली आहे. सोमवारी (ता. १७) रात्री आठला २१.६२ टक्‍के पाणीसाठा झाल्याची नोंद झाली असल्याचे जायकवाडी धरण सहायक अभियंता अशोक चव्हाण यांनी कळविले.

मराठवाडा

पूर्णा (परभणी): तालुक्यातील बरबडी येथील लक्ष्मण गणेश सोलव या बावीस वर्षीय अल्पभूधारक शेतकऱ्यांने कर्जबाजारीपणामुळे गळफास घेऊन...

मंगळवार, 19 सप्टेंबर 2017

मराठवाडा जनता विकास परिषदेच्या पाठपुराव्याला यश औरंगाबाद : दमणगंगेचे पन्नास टीएमसी (50 अब्ज घनफुट) पाणी गोदावरी खोऱ्यात सोडून...

मंगळवार, 19 सप्टेंबर 2017

लोहा : बैलगाडा घेऊन शेतीकामाला जात असताना बैलगाडा उलथून झालेल्या अपघातात शेतमजुराचा मृत्यू झाला. ही घटना हिप्परगा गावालगतच्या...

मंगळवार, 19 सप्टेंबर 2017