पाणीपुरवठा ४८ तास लेट

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 24 ऑगस्ट 2017

औरंगाबाद - शहरातील पाणीपुरवठा गेल्या आठ दिवसांपासून विस्कळित झाला असून, बुधवारी (ता. २३) स्थायी समितीच्या बैठकीतही याचे पडसाद उमटले. वीजपुरवठा वारंवार खंडित होत असल्याने पाणी ४८ तास उशिराने मिळत असल्याचा खुलासा प्रशासनातर्फे या वेळी करण्यात आला. 

औरंगाबाद - शहरातील पाणीपुरवठा गेल्या आठ दिवसांपासून विस्कळित झाला असून, बुधवारी (ता. २३) स्थायी समितीच्या बैठकीतही याचे पडसाद उमटले. वीजपुरवठा वारंवार खंडित होत असल्याने पाणी ४८ तास उशिराने मिळत असल्याचा खुलासा प्रशासनातर्फे या वेळी करण्यात आला. 

शहरातील विस्कळित पाणीपुरवठ्याचा प्रश्‍न सीताराम सुरे यांनी उपस्थित केला. त्यानंतर राजू वैद्य, स्वाती नागरे, सोहेल शेख आक्रमक झाले. पाणीपुरवठा विभागाचे ढिसाळ नियोजन असून, शहरातील १६ लाख नागरिक त्रस्त आहेत, असा आरोप सदस्यांनी केला. त्यावर खुलासा करताना पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता सरताजसिंह चहेल यांनी जायकवाडी येथील पाणीपुरवठा योजनेची तब्बल ११ वेळा वीज गेली होती. त्यामुळे शहरात नियोजित वेळेपेक्षा ४८ तास उशिराने पाणी मिळत आहे. महापालिका व महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी संयुक्त पाहणी केली असता, झाडांच्या वाढलेल्या फांद्यांमुळे वीजपुरवठा विस्कळित होत असल्याचे समोर आले. त्यानुसार फांद्या तोडण्याचे आदेश कंपनीतर्फे देण्यात आले आहेत. अविरत वीज मिळावी यासाठी २० लाख रुपये भरण्याचा प्रस्ताव अद्याप कंपनीने दिलेला नाही, असे श्री. चहेल यांनी सांगितले. 

मुख्य जलवाहिनीसाठी प्रयत्न 
वीजपुरवठा खंडित होण्याबरोबरच जलवाहिनीही वारंवार फुटत असल्याने पाणीपुरवठ्यात व्यत्यय येत आहे. त्यामुळे पैठणवरून मुख्य जलवाहिनीचे काम सुरू होणे गरजेचे असल्याची मागणी सदस्यांनी केली. त्यावर सभापतींनी पुढील बैठकीत या संदर्भात प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना केल्या.

‘आपत्कालीन’ गैरवापर 
आपत्कालीन खर्चासाठी असलेल्या अधिकाराचा श्री. चहेल गैरवापर करीत असल्याचा आरोप राजू वैद्य यांनी केला. त्यांनी टॅंकरसाठी आठ महिने, तर ११६ मजुरांचे पैसे देताना हे अधिकार वापरून आयुक्तांची दिशाभूल केली आहे, असे श्री. वैद्य यांनी सांगितले. त्यावर सभापतींनी यापुढे असा प्रकार होता कामा नये, अशी तंबी श्री. चहेल यांना दिली.

Web Title: aurangabad marathwada news water supply 48 hrs. late