विमानतळावर एअर डेक्कनची चाचपणी

विमानतळावर एअर डेक्कनची चाचपणी

औरंगाबाद - ‘एअर डेक्कन’ या विमान कंपनीने नवीन विमान सेवा सुरू करण्याची तयारी दर्शवली असून, नवीन वर्षात ही विमान सेवा औरंगाबाद विमानतळावरून सुरू होण्याची शक्‍यता असल्याचे सूत्रांनी सांगितले. 

औरंगाबाद विमानतळावरून जानेवारी महिन्यात ‘एअर डेक्कन विमान कंपनी’ने विमानसेवा सुरू करण्याबाबत तयारी दर्शविल्याचे सांगण्यात येत आहे. उड्‌डाण योजनेत औरंगाबादचा समावेश झाल्यानंतर झूम एअर, इंडिगो आणि डेक्कन एअर कंपन्यांनी येथून विमानसेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

यासंदर्भात वेळोवेळी अधिकाऱ्यांसोबत चर्चाही झाली आहे; मात्र प्रत्यक्षात निर्णय झालेला नाही. झूम एअर कंपनीने औरंगाबाद ते दिल्ली विमानसेवा सुरू करण्याचा निर्णय जाहीर केला होता, ऑक्‍टोबर महिन्यातच ही सेवा सुरू होणार होती. प्रत्यक्षात स्लॉट मिळत नसल्याने विलंब होत असल्याचे सांगण्यात येत आहे. याशिवाय डेक्कन एअरच्या प्रतिनिधींनी नुकतीच औरंगाबादच्या आंतरराष्ट्रीय विमानतळास भेट देऊन प्रवासी संख्या व सुविधांची माहिती घेतल्याचे सूत्रांनी सांगितले. 

कार्गो सेवेचा मुहूर्त हुकणार 
औरंगाबाद चिकलठाणा विमानतळावरून आंतरराष्ट्रीय कार्गो सुविधा देण्यासाठी गेल्या दोन वर्षांपासून प्रयत्न करण्यात येत आहेत.

विमानतळाच्या जुन्या इमारतीत आंतरराष्ट्रीय कार्गो सुविधा सुरू करण्यात येणार आहे. त्यानुसार दिल्लीहून आलेल्या सुरक्षा समितीकडून सुरक्षेबाबत योग्य नियोजन करण्याचा अहवालही देण्यात आला होता. प्रत्यक्षात आंतरराष्ट्रीय कार्गो सेवा सुरू करण्याबाबत अद्याप हालचाली झाल्या नाहीत. सुरक्षा समितीच्या तपासणी अहवालानुसार कार्गोच्या इमारतीमध्ये आवश्‍यक ते बदल करण्यात आले. याशिवाय कार्गो सुविधा उपलब्ध करून देताना ग्राहकांना कमीत कमी अडचणी येतील, असे नियोजन विमानतळ प्राधिकरणाने केलेले आहे. याशिवाय कार्गोसंदर्भात बांधकामविषयक कामांची पूर्तता करण्यात आली. कार्गोच्या सुरक्षेसाठी आवश्‍यक कामांचे नियोजन झाले, यात प्रामुख्याने सीसीटीव्ही कॅमेरे, स्कॅनर, मशिन पॉइंट आणि अन्य आवश्‍यक कामांची पूर्तता डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात केली जाणार होती. ही कामे पूर्ण केल्यानंतर आंतरराष्ट्रीय कार्गो सुविधा सुरू करण्याचा मार्ग मोकळा होणार होता. हे काम आटोपताच डिसेंबरमध्ये मुहूर्त काढण्यात येणार होता; मात्र अद्याप काहीही हालचाली दिसत नसल्याने डिसेंबरचा मुहूर्त हुकण्याची चिन्हे आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com