मुख्यमंत्र्यामूळे अधिकारी, पोलिसांची भागम्‌भाग

मुख्यमंत्र्यामूळे अधिकारी, पोलिसांची भागम्‌भाग
मुख्यमंत्र्यामूळे अधिकारी, पोलिसांची भागम्‌भाग

विमानतळावर 'आऊट' ऐवजी इन गेट आले बाहेर

औरंगाबाद : गंगापूर तालुक्‍यातील गवळी शिवरा येथे अखंड हरीनाम सप्ताह निमित्त विशेष विमानाने आलेल्या मुख्यमंत्र्यामुळे आज (शुक्रवार) विमानतळावर सुरक्षा आणि प्रॉटोकॉल नुसार उपस्थित असलेल्या अधिकाऱ्यांची, पोलिसांची चांगली भागम्‌भाग झाली. विमातळावर मुख्यमंत्री आऊट गेट ऐवजी इन गेट ने बाहेर आल्याने अधिकाऱ्यांची चांगलीच धावपळ झाली.

गंगापूरच्या गवळी शिवरा येथील कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानसभा अध्यक्ष हरीभाऊ बागडे व जलसंधारण राम शिंदे हे खासगी विमाने सकाळी दहा वाजता चिकलठाणा विमानतळावर दाखल झाले. नियमीतपणे आऊटगेटने बाहेर जाण्याऐवजी मुख्यमंत्र्यांनी विमानतळाच्या गेस्ट रुमकडे गेले. काही मिनिटाच तिकडूनच ते प्रवेशाच्या द्वाराने (इन गेटने) बाहेर आले. इकडे आऊट गेटजवळ त्यांची वाट पाहत उभे असलेले पोलिस, विविध विभागाचे वरिष्ठ अधिकारी ते प्रवेश द्वाराने बाहेर येणार असल्याची माहिती मिळताच तिकडे पळावे लागले. यामूळे त्यांच्यासाठी आणण्यात आलेल्या चारचाकी वाहने इकडून तिकडे नेण्यावी लागली. दोन ते तीन मिनेटे कर्मचारी, अधिकारी, सुरक्षा यंत्रणा इकडे-तिकडे धावपळ करीत होते. प्रवेशद्वारातून मुख्यमंत्र्यांनी बाहेर येत गंगापूरकडे रवाना झाले होते. त्या पंधरा मिनिटात अधिकारी, पोलिसांसह इतर झेड सुरक्षा रक्षकांचीही चांगलीच भागम्‌ भाग पहायला मिळाली. प्रमुख्याने आतापर्यंत सर्वच नेते, मंडळी ते व्हिआयपींनाही आऊट गेटने बाहेर आले. मात्र, मुख्यमंत्र्यांना आज प्रवेश गेट का बाहेर येवे लागेले याची माहिती कोणाकडेच नाही.

स्वागतासाठी मोजकेच नेते
मुख्यमंत्र्यांचा दौरा असल्यास भारतीय जनता पक्षाचे सर्वच पदाधिकारी विमानतळावर स्वागतासाठी उपस्थित असतो. आज मात्र केवळ महापौर भगवान घडामोडे, गजानन बारवाल इतर कार्यकर्तेच स्वागतासाठी उपस्थित होते. यावेळी आमदार, जिल्हाध्यक्ष,मोर्चाचे पदाधिकारी, भाजपचे प्रवक्‍ता यांची मात्र गैरहजरी दिसून आली. या विषयी जिल्हाध्यक्ष किशनचंद तनवाणी यांना विचारले असता, मी आजारी असल्यामूळे येऊ शकलो नसल्याचे त्यांनी सांगितले. प्रवक्‍ते शिरीष बोराळकर म्हणाले, मी मुंबईला होतो. आताच शहरात आलो आहेत. अधिवेशन सुरु असल्यामूळे आमदारसह बरेच लोक येऊ शकले नसल्याचे बोराळकर यांनी सांगितले.                       

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com