औरंगाबाद महापालिकेला रस्त्यांसाठी शंभर कोटी 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 28 जून 2017

शेतकऱ्यांनी आंदोलन केले, संप केला त्यामुळे सरकारने कर्जमाफीचा निर्णय घेतला. हे यश केवळ शेतकऱ्यांचे असल्याचे सांगत रावसाहेब दानवे यांनी शिवसेनेला टोला लगावला.

औरंगाबाद : शहारातील दुरावस्था झालेल्या रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी राज्य सरकारने औरंगाबाद महापालिकेला शंभर कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. विशेष म्हणजे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी औरंगाबाद भेटीत भाजपच्या महापौरांना रस्त्यांसाठी दीडशे कोटी रुपये देण्याचे मान्य केले होते. 

निधी मिळण्याआधीच शिवसेना आणि भाजपमध्ये श्रेयवादाची लढाई सुरु झाली होता. आता जेव्हा प्रत्यक्षात निधी मंजुर झाला आहे, तेव्हा मात्र त्यात पन्नास कोटींची कपात करण्यात आल्याने आश्‍यचर्य व्यक्त केले जात आहे. 

कर्जमाफीचे यश केवळ शेतकऱ्यांचे 
राज्यातील शेतकऱ्यांना 34 हजार दोनशे कोटींची ऐतिहासिक कर्जमाफी देण्यात आली आहे. कर्जमाफी मिळावी ही सर्वच पक्षांची मागणी होती. परंतु शेतकऱ्यांनी आंदोलन केले, संप केला त्यामुळे सरकारने कर्जमाफीचा निर्णय घेतला. हे यश केवळ शेतकऱ्यांचे असल्याचे सांगत रावसाहेब दानवे यांनी शिवसेनेला टोला लगावला.

दीड लाखापर्यंतची कर्जमाफी सरकारने केली असली तरी आधीचे कर्ज त्याने आधी भरावे मग त्याला दीड लाखांचा लाभ मिळेल ही अट जाचक नाही का? यासह कर्जमाफी विषयावरील सर्वच प्रश्‍नांना बगल देत दानवे यांनी पत्रकार परिषद गुंडाळली.