दोन सख्ख्या भावांना कंटेनरची धडक 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 11 जुलै 2017

वाळूज - कंटेनर आणि दुचाकी यांच्यात समोरासमोर धडक झाली. यात दुचाकीवरील दोन सख्ख्या भावांपैकी एक जागीच ठार; तर दुसरा गंभीर जखमी आहे. हा अपघात नागपूर-मुबंई एक्‍स्प्रेसवेवरील खवड्या डोंगराजवळ सोमवारी (ता. १०) दुपारी ३ वाजताच्या सुमारास झाला. सय्यद कबिरोद्दीन चिस्ती (आसेफिया कॉलनी, औरंगाबाद) असे मृताचे नाव आहे.

प्राप्त माहितीनुसार, सय्यद कबिरोद्दीन चिस्ती (४५) हे त्यांचे भाऊ फेमोद्दिन चिस्ती (४०) यांच्यासह औरंगाबादहून साजापूरकडे दुचाकीने (एमएच-२० सीएम -९१६२) वरून जात होते. खवड्या डोंगराजवळ त्यांच्या दुचाकीची लासूर स्टेशनकडून भरधाव वेगात येणाऱ्या कंटेनरशी (एमएच-४०, एके-२१७२) धडक झाली. यात दुचाकीवरील सय्यद कबिरोद्दीन जागीच ठार झाले; तर त्यांचे भाऊ गंभीर जखमी झाले. या प्रकरणी जाहेद मुस्ताक शेख यांच्या तक्रारीवरून वाळूज एमआयडीसी पोलिस ठाण्यात कंटेनर चालकाविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. अधिक तपास पोलिस हेडकॉन्स्टेबल भीमराव शेवगे करीत आहेत.