एसटीच्या संपामुळे अजिंठा लेणीत पर्यटकांची तारांबळ

संकेत कुलकर्णी
मंगळवार, 17 ऑक्टोबर 2017

देशी-विदेशी पर्यटकांची गैरसोय टळावी, यासाठी काही मध्यम मार्ग काढावा, अशी अपेक्षा टुरिस्ट प्रमोटर्स गील्डचे अध्यक्ष जसवंत सिंग यांनी व्यक्त केली.

औरंगाबाद : एसटी बस संपामुळे अजिंठा लेणीजवळ मंगळवारी (ता. 17) पर्यटकांची कोंडी झाली आहे. पर्यटक केंद्रापासून लेणीपर्यंत घेऊन जाण्यासाठी असलेल्या इको बस बंद असल्यामुळे पर्यटक अडकून पडले आहेत. 

अजिंठा लेणीकडे जाण्यासाठी अनेक वर्षांपासून खासगी वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. तेव्हापासून परिवहन महामंडळाच्या बसेसमधून पर्यटकांना नेले आणले जाते. काही वर्षांपूर्वी या ठिकाणी इको बस आणण्यात आल्या. आज बस संपामुळे लेणीकडे जाण्यासाठी अन्य सुविधा नसल्यामुळे मोठा गोंधळ सुरू झाला. पर्यटकांची ने-आण करण्यासाठी काहींनी बैलगाडीची सोय केली. पण बैलगाडीवाले एका फेरीचे 500 रुपये घेत असल्यामुळे पर्यटक चिडले आहेत. काही पर्यटक पायीच लेणीकडे निघाले आहेत. 

देशी-विदेशी पर्यटकांची गैरसोय टळावी, यासाठी काही मध्यम मार्ग काढावा, अशी अपेक्षा टुरिस्ट प्रमोटर्स गील्डचे अध्यक्ष जसवंत सिंग यांनी व्यक्त केली.

टॅग्स