महापालिका पर्यटन केंद्र खासगीकरणाचा प्रस्ताव रद्द 

महापालिका पर्यटन केंद्र खासगीकरणाचा प्रस्ताव रद्द 

औरंगाबाद - वर्षभरापूर्वी मोठा गाजावाजा करून सुरू करण्यात आलेले महापालिकेचे पर्यटन केंद्र बंद करून ते खासगी संस्थेला देण्याच्या प्रस्तावाला नगरसेवकांनी कडाडून विरोध केला. त्यानंतर हा प्रस्तावच रद्द करण्यात आल्याने प्रशासनाच्या मनसुब्यांवर पाणी फेरले आहे. 

महापालिकेने रेल्वेस्टेशनसमोर पर्यटन केंद्र सुरु केले आहे. तत्कालीन महापौर त्र्यंबक तुपे यांनी शहरात येणाऱ्या पर्यटकांना एकाच ठिकाणी पर्यटनस्थळांची माहिती मिळावी म्हणून पर्यटन केंद्र सुरू केले. सुरवातीला काही खासगी संस्थांनी मदत करत या केंद्राच्या खर्चाचा भार उचलला. मात्र येथे काम करणाऱ्या विद्यार्थ्यांचे वेतन देण्यास विलंब झाल्याने केंद्र वादात सापडले होते. या केंद्राला आतापर्यंत 60 हजार पर्यटकांनी भेट देऊन विचारपूस केली. मात्र हे केंद्र बंद करुन खासगी संस्थेच्या हवाली करण्यासाठी प्रशासनाने हालचाली सुरु केल्या होत्या. तसा प्रस्तावही सोमवारी (ता. 18) पार पडलेल्या सर्वसाधारण सभेत मांडला होता. मात्र नंदकुमार घोडेले, गजानन बारवाल यांनी याला विरोध केला. 

जवळच एमटीडीसीचे कार्यालय असल्याने या केंद्राचा फायदा होत नसल्याचा दावा प्रशासनाने केला. मात्र पर्यटकांना चांगला फायदा होत असल्याचे सांगत हे केंद्र बंद करण्यास नगरसेवकांनी हरकत घेतली. त्यावर निर्णय देताना महापौर भगवान घडामोडे यांनी येथे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे वेतन लवकरात लवकर देण्याचे नियोजन करावे, अशा सूचना देत हा ठराव रद्द करण्यात येत असल्याचेही सांगितले. त्यामुळे प्रशासनाच्या मनसुब्यावर पाणी फेरले गेले. हे केंद्र एमटीडीसीसह इतर खासगी संस्थांना न देता महापालिकेनेच चालवावे, अशी सूचनाही यावेळी करण्यात आली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com