'तो' पासवर्ड हेरायचा अन्...एटीएममधील रक्कम हडपायचा

पासवर्ड हेरायचा अन्...एटीएममधील रक्कम हडपायचा
पासवर्ड हेरायचा अन्...एटीएममधील रक्कम हडपायचा
  •  हरियानाच्या भामट्याचा औरंगाबादकरांना झटका
  •  एटीएम केंद्रातून हडपली पाऊने सहा लाखांची रक्कम

औरंगाबाद: एटीएम सेंटरवर रांगेत उभा राहून इतरांचा पासवर्ड हेरायचा, एटीएम खराब झाले, ट्रान्जेक्‍शन रद्द झाले असे सांगून युजर्सला एटीएमसेंटर बाहेर पाठवायचा अन्... क्षणात युजर्सने मशीनवर ऑपरेट केलेली रक्कम हडपण्याचे कारनामे तो करीत होता.

तुमचा विश्‍वास बसनार नाही. पण ही बाब खरीय. हरियाणाच्या ट्रकचालकाने अशा पद्धतीने चौदा एटीएम युजर्सना पाऊने सहा लाखांचा गंडा घातल्याचे औरंगाबादमध्ये उघड झाला, त्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

मोहम्मद सलीम हाजीरखान (वय 33) असे या भामट्याचे नाव असुन तो हरियानाचा आहे. औरंगाबादेतील कचनेरनजीक खोडगाव येथे त्याची सासुरवाडी आहे. सासरी आल्यानंतर तो शहरातील मुकुंदवाडी भागातील एटीएमसेंटरवर ठाण मांडीत होता. तेथे पैसे काढण्यासाठी येणाऱ्या नागरिकांवर लक्ष ठेवून असायचा. जास्त ज्ञान नसलेल्या एटीएम युजर्स एटीएम मशीनमध्ये कार्ड स्वॅप करुन पासवर्ड फिड करताना तो लक्ष ठेवून असायचा. पैशांच्या बटणावर प्रेस करताच हा भामटा मध्येच युजर्सना अडवायचा. एटीएम मशीनची पुर्ण प्रक्रिया होण्याआधीच तो एटीएममध्ये पैसे नाही, ट्रान्जेक्‍शन रद्द झाले अशी नानाविध कारणे सांगून युर्जसना एटीएमसेंटर बाहेर पाठवायचा. त्यानंतर क्‍लोनिंगसारखे तंत्रज्ञान वापरुन भामटा पैसे काढून पोबरा करायचा. अशाच पद्धतीने त्याने मुकुंदवाडी भागातील एटीएम सेंटरवर ठाण मांडले होते. त्याला पोलिसांनी अटक केली असून, त्याच्याकडून पाच एटीएम व सुमारे बारा हजारांची रक्कम जप्त केली आहे.

एसबीआयच्याच एटीएमवर गंडा
भामट्याने मुकुंदवाडी येथील भाजी मंडीत असलेल्या एटीएम केंद्रावरच नागरिकांना गंडवले आहे. विशेषत: सर्व एटीएम सेंटर भारतीय स्टेट बॅंकेची असून चौदा प्रकरणात त्याचा कारनामा उघड झाला. त्याने आणखी विविध ठिकाणी अशी मोडस वापरुन गंडवल्याची शक्‍यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

हे तुमच्या सोबतही होऊ शकते...!
जर तुम्ही एटीएम सेंटरवर गेला, तर तिथे आजुबाजुला असलेल्यांना बाहेर थांबायला सांगा. कारण काहीवेळा मुद्दामहुन पासवर्ड हेरण्यासाठी बाजुला भामटेही उभे राहु शकतात. एटीएममधून पैसे निघत नसतील तर पुर्ण प्रक्रिया होईपर्यंत थांबा अन्यथा भामट्यांच्या जाळ्यात तुमचे पैसे गेलेत म्हणून समजा.

ई सकाळवरील ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा :

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com