औरंगाबाद जिल्ह्यात साक्षरतेचे प्रमाण ७९ टक्‍के

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 10 सप्टेंबर 2017

औरंगाबाद - निरक्षरता निर्मूलनासाठी जागतिक स्तरावर आठ सप्टेंबर आंतरराष्ट्रीय साक्षरतादिन म्हणून साजरा करण्यात येतो. यानिमित्ताने शुक्रवारी (ता. आठ) फाजलपुरा येथील ताज ऊल उलूम माध्यमिक शाळेतर्फे साक्षरता दिंडी काढून विविध कार्यक्रम घेण्यात आले. मराठवाड्यातील आठपैकी सात जिल्ह्यांमध्ये महिला साक्षरतेचे प्रमाण राष्ट्रीय साक्षरतेपेक्षा कमी आहे.

त्यामुळे त्या जिल्ह्यात साक्षर भारत कार्यक्रम राबविण्यात येत आहे, मात्र यातून औरंगाबाद जिल्हा वगळण्यात आला आहे. जिल्ह्यात साक्षरतेचे प्रमाण ७९ टक्‍के असल्याचे या वेळी सांगण्यात आले. जिल्हा परिषदेचे निरंतर शिक्षण शिक्षणाधिकारी कार्यालयातर्फे आंतरराष्ट्रीय साक्षरता दिनानिमित्त विविध कार्यक्रम घेण्यात आले. विद्यार्थ्यांनी त्यात सहभागी होऊन आपले कौशल्य सादर केले. साक्षरतेविषयी जनजागृती करण्याच्यादृष्टीने साक्षरता दिंडी काढण्यात आली. 

औरंगाबाद जिल्ह्यात २०११ च्या जनगणनेनुसार साक्षरतेचे प्रमाण ७९.२ टक्‍के आहे. त्यात पुरुष साक्षरतेचे प्रमाण ८७.३७ टक्‍के, तर महिलांचे प्रमाण ७०.८ टक्‍के इतके आहे, अशी माहिती या वेळी सांगण्यात आली. या वेळी निरंतर शिक्षणचे उपशिक्षणाधिकारी काझी मोईनुद्दीन, पर्यवेक्षक एस. एस. राऊत, जे. बी. दाभाडे, ताज ऊल उलूम माध्यमिक शाळेचे संचालक इब्राहीम यांची प्रमुख उपस्थिती होती.

Web Title: aurangabad news Aurangabad district has an average literacy rate of 79%