बी. टी. कपाशीचे गणित कसे जुळवणार?

सुषेन जाधव
रविवार, 1 ऑक्टोबर 2017

मराठवाड्यातील चित्र ः संशोधनासाठी कृषी विभाग, विद्यापीठांनी पुढाकार घेण्याची गरज

औरंगाबाद: कोणतेही तंत्रज्ञान वापरापूर्वी ते राबविण्याच्या पूरक बाबी लक्षात घ्यायला हव्यात. मराठवाड्यात नगदी पीक म्हणून घेतल्या जाणाऱ्या बी. टी. कपाशी पिकांबाबतही तेच झाले. कीड रोग नियंत्रण, व्यवस्थापन आदींमुळे आता घ्यावे की नको अशी साशंकता निर्माण झाली आहे. त्यामुळे बीटी वाणाबद्दलची सध्याची डोकेदुखी भविष्यात दूर व्हावी, यासाठी कृषी विभाग, कृषी विद्यापीठांनी वेळीच पावले उचलायला हवीत. कारण मध्यम ते हलक्‍या जमिनीत येणारे नगदी पीक बी. टी.ने शेतकऱ्यांना तारले आहे, हे विसरून चालणार नाही.

एकेकाळी बैलगाडीतून मार्केटला जाणारा कापूस आज ट्रकने जातो आहे, मात्र त्या काळात मिळणाऱ्या उत्पादन, उत्पन्नाशी तुलना केली तर सध्या "जैसे थे' हीच अवस्था असल्याचे दिसून येत आहे.

कधी अन्‌ कसे चुकले गणित
सुरवातीला बी जी-1 आणि बी जी-2 अशा क्रमाने वाण दाखल झाले. नॉन बीटीच्या लागवडीमुळे काही प्रमाणात कपाशीवरील कीड रोगांस प्रतिबंध झाला खरा, मात्र रस शोषण करणाऱ्या किडीचा उद्रेक झाल्याने ही दुसरी समस्या वाढत गेली. मावा, तुडतुडे, फुलकिडे, पांढरी माशी, पिठ्या ढेकूण आदी किडींचे प्रमाण हे बी. टी. कपाशीवर वाढले, तसे शेतकऱ्यांनी रासायनिक कीटकनाशकांच्या फवारणीचे प्रमाण वाढविले. परिणामी उत्पादनखर्चात वाढ झाली. पावसाच्या अपुऱ्या खंडामुळे या खर्चात अधिकची वाढ झाल्याने मराठवाड्यात हे पीक आता डोकेदुखी ठरू लागले आहे.

बी. टी. कपाशीची तंत्रशुद्ध लागवड होताना सध्या तरी दिसून येत नाही. अनेक शेतकरी नॉनबीटीची लागवड करत नाहीत. परिणामी कीड रोगांसारख्या समस्यांना सामोरे जावे लागते. यंदा हवामान बदल, पावसाचा खंड आदींमुळे कपाशी लागवडीपासून साधारण तीन महिन्यानंतर आढळून येणारी गुलाबी बोंडअळी यंदा तब्बल एक महिना आधीच आढळून आली. कृषी विभाग, कृषी विद्यापीठांनी अशा वेळी आपत्कालीन भूमिका म्हणावी तशी निभावली नाही. यंदाचा कापूस हंगाम खऱ्या अर्थाने "बहरला'च नाही. सध्या बी. टी.च्या वापराबाबत राष्ट्रीय स्तरावर सुरू आहे. यावर प्रत्येकजण मतमतांतरे व्यक्त करीत आहेत; परंतु हे तंत्रज्ञान गरजेचे कसे आहे? यावरही मंथन होण्याची गरज आहे. बी. टी. तंत्रज्ञान चांगले की वाईट या वादात पडण्यापेक्षा चांगल्या उत्पादनासाठी पूरक ठरणाऱ्या वाणाचा विचार व्हावा आणि त्यासाठी सर्वांनीच पुढे यायला हवे.

Web Title: aurangabad news b t kapashi and marathwada