हे सरकार तर कलम कसाई -  बच्चु कडू

अनिल जमधडे
शुक्रवार, 9 जून 2017

औरंगाबाद - "हे सरकार कलम कसाई आहे. एका निर्णयात लाखो शेतकऱ्यांना मारणारा निर्णय घेतात. 13 जून रोजी राज्यभर रेले रोको आंदोलन आहे तरी ही सरकारला जाग आली नाही तर मुख्यमंत्री, नेत्यांचे विमान उडु देणार नाही,'' अशा इशारा आमदार बच्चु कडू यांनी आज (शुक्रवार) औरंगाबादेतील सुभेदारी विश्रामगृहावर झालेल्या पत्रकार परिषदेत दिला. 

बच्चु कडू म्हणाले की, साडे तीन लाख शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या, याला चुकीची घोरणे कारणीभूत आहेत, शेतकऱ्यांनी पीक बदलून पाहिले, शेतीची पद्धत बदलली, पक्ष अन नेतेही बदलून पाहिले मात्र लूट काही थांबत नाही. याला चुकीची धोरणे कारणीभूत आहेत. शेतकऱ्यांची वर्गवारी करा, अल्पभूधारक मधील अल्प शब्द काढा, कर्मचारी, अधिकारी आणि नेत्यांना कर्जमाफीतून वगळण्यास हरकत नाही. जमीन किती त्यावर कर्जमाफी ठरवू नका. शेतकरी लढाई निर्णायक टप्प्यात आहे. शेतकऱ्यांना न्याय मिळेल मात्र मुख्यमंत्र्यांनी डोक्‍यातुन भाजप काढला तर ते पंधरा मिनिटात निर्णय घेऊ शकतात. शेतकऱ्यांना 50 टक्के नफा गृहीत धरून हमी भाव देणार, अशी घोषणा मोदी यांनी केली होती, पण पाळली नाही. त्यामुळे त्यांचा जगातील सर्वात मोठा पुतळा उभारणार, पण तो उभा कि आडवा, हे शेतकऱ्यांचे मत जाणून ठरवू, असे कडु म्हणाले