औरंगाबादः बाजार समिती सभापतींवर अविश्‍वास ठराव मंजूर

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 22 ऑगस्ट 2017

वर्चस्वाच्या लढाईत भाजपचे विजयाकडे वाटचाल; 13 विरुद्ध शुन्य मतांचा ठराव

औरंगाबाद: मराठवाड्याचे लक्ष लागून राहीलेल्या औरंगाबाद कषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संजय औताडे यांच्याविरुद्धचा अविश्‍वास प्रस्ताव आज (मंगळवार) 13-0 मतांनी मंजूर झाला. विधनासभा अध्यक्ष हरीभाऊ बागडे व माजी आमदार कल्याण काळे यांच्यातील वर्चस्वाच्या लढाईत भारतीय जनता पक्षाने विजायाचा पहिले पाऊल टाकले आहेत. "सकाळ'ने दिलेले वृत्त खरे ठरले आहे. या ठरावनंतर बाजार समितीत भाजपतर्फे जल्लोष करण्यात आला.

कोट्यावधीची रुपयांची उलाढाल असणाऱ्या औरंगाबाद बाजार समितीचे सभापती संजय औताडे यांच्याविरुद्ध 11 ऑगस्टला भारतीय जतना पक्षाने 12 संचालकांच्या सह्याने अविश्‍वास प्रस्ताव दाखल केला होता. अविश्‍वास प्रस्तावावर मतदान घेण्यासाठी मंगळवारी विशेष बैठक घेण्यात आली. उपविभागीय अधिकारी शशिकांत हदगल, बाजार समितीचे सचिव विजय शिरसाठ यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत 13 संचालक हजर होते. सर्वांनी हात उंचावून अविश्‍वास प्रस्तावाच्या बाजूने मतदान केले. अविश्‍वास मंजूर झाल्यानंतर भाजपच्या कार्यकर्त्यांनी फटाके फोडून तसेच गुलाल उधळून जल्लोष केला. बाजार समितीच्या नवीन सभापतिंची निवड पुढील आठवड्यात होणार आहे. सभापती औताडेंसह इतर पाच संचालक बैठकीस गैरहजर होते.

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या :
मराठ्यांनो, जातीय अस्मितेच्या विळख्यातून बाहेर पडा...
‘आई, तिला विचार तू का आलीस?’
तुरुंगातील 'व्हीआयपी' बडदास्त सीसीटीव्हीतून उघड
डोकलामप्रश्‍नी लवकरच तोडगा निघेल : गृहमंत्री
भाजप सुसाट; "राष्ट्रवादी' सपाट 
डेंगीचा आजपासून नायनाट
राज ठाकरे आज पुण्यात 
भाजपच्या भूमिकेमुळेच मंत्रिमंडळ विस्तार लांबला
तातडीचे कर्ज फक्त २४ हजार शेतकऱ्यांना
स्वाइन फ्लूचे अत्यवस्थचे सर्वाधिक रुग्ण पुण्यात