औरंगाबादेतील सातारा परिसरात बँक अधिकाऱ्याचा खून

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 9 सप्टेंबर 2017

जितेंद्र नारायण होळकर (वय :45 रा. छत्रपती नगर, सातारा परिसर, औरंगाबाद) असे मृताचे नाव आहे. ते शेकटा मध्यवर्ती बँकेत व्यवस्थापक होते. शुक्रवारी (ता. 8) रात्री जेवण करून अकराच्या सुमारास कुटुंबीय झोपले होते. मात्र त्यानंतर शनीवारी पहाटे अडीचच्या सुमारास ते रक्ताच्या थारोळ्यात पडल्याची बाब कुटुंबियांच्या लक्षात आली हि घटना पाहून कुटुंबीय हादरले.

औरंगाबाद : औरंगाबादेतील सातारा परिसर येथील छत्रपतीनगरात जिल्हा मध्यवर्ती बँकेतील अधिकाऱ्याचा खून करण्यात आला. हि गंभीर घटना आज (शनिवारी) पहाटे  2.30 च्या सुमारास उघड झाली.

पोलिसांनी माहिती दिली की, जितेंद्र नारायण होळकर (वय :45 रा. छत्रपती नगर, सातारा परिसर, औरंगाबाद) असे मृताचे नाव आहे. ते शेकटा मध्यवर्ती बँकेत व्यवस्थापक होते. शुक्रवारी (ता. 8) रात्री जेवण करून अकराच्या सुमारास कुटुंबीय झोपले होते. मात्र त्यानंतर शनीवारी पहाटे अडीचच्या सुमारास ते रक्ताच्या थारोळ्यात पडल्याची बाब कुटुंबियांच्या लक्षात आली हि घटना पाहून कुटुंबीय हादरले. त्यानी सातारा पोलिसांना घटनेची माहिती दिली. पोलिसांनी धाव घेत पंचनामा केला. प्रथमदर्शनी हा खुनाचा प्रकार असल्याचे उघड झाले.

तर दुसरीकडे गच्चीवरून घरात तीन ते चार जण घुसले व त्यांनी होळकर यांचा खून केला असा तर्क लावला जात आहे. खुनाचे कारण स्पष्ट झाले नसून पोलिस तपास करीत आहेत. घटनेनंतर सकाळपर्यंत   नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.

टॅग्स