बीड बायपासवर पुन्हा जड वाहनांना बंदीचे संकेत

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 7 जुलै 2017

औरंगाबाद - बीड बायपासवर ठराविक वेळेतील उठवण्यात आलेली जड वाहनांवरची बंदी पुन्हा लागू होण्याचे संकेत आहेत. दुपारी बारा ते चारपर्यंत जड वाहनांना परवानगी दिली जाणार असून उर्वरित वेळेत बंदी राहील. याबाबत वाहतूक विभागाचा अधिकृत आदेश आल्यानंतरच कार्यवाही होणार आहे.  

सातारा पोलिस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात पोलिस व जनता संमेलन गुरुवारी (ता. सहा) पोलिस आयुक्त यशस्वी यादव यांच्या उपस्थितीत झाले. या संमेलनात शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख व नगरसेवक नंदकुमार घोडेले यांनी बीड बायपासवरील वाहतुकीचा मुद्दा उपस्थित केला. बीड बायपास जड वाहतुकीमुळे धोकादायक बनला आहे. नियोजित वेळेत जड वाहनांना बंदी होती. ही बंदी कायम करावी, या भागात रस्त्यांचे काम सुरू असून निदान काम पूर्णत्वास येईपर्यंत जड वाहनांना या मार्गावर ठराविक वेळेत बंदी घालावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. या मागणीला पोलिस आयुक्तांनी सहमती दर्शविली आहे. त्यामुळे जड वाहनांना बीड बायपास ठराविक वेळेत रहदारीसाठी बंद होण्याची शक्‍यता निर्माण झाली. 

यापूर्वी तत्कालीन पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनीही बीड बायपासवर सकाळी व सायंकाळच्या सत्रात जड वाहनांना बंदी घातली होती. दुपारी बारा ते चारपर्यंत जड वाहनांना रहदारीची मुभा दिली होती. आता पुन्हा जड वाहनांना बंदी घातली जाणार असून यासंबंधीचे आदेश लवकरच निघतील, असे पोलिस आयुक्तांनी सांगितल्याचे नगरसेवक श्री. घोडेले यांनी सांगितले.

टॅग्स