बीड जिल्हा बॅंकेचा तपास अहवाल खंडपीठात दाखल 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 1 ऑगस्ट 2017

औरंगाबाद - बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या फसवणूक प्रकरणात विशेष तपास पथकाचा अहवाल उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दाखल करण्यात आला. या प्रकरणी न्यायमूर्ती टी. व्ही. नलावडे व न्यायमूर्ती सुनील कोतवाल यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. या वेळी पथकाचे पोलिस अधिकारी हजर होते. पुढील तीन महिन्यांत तपासाचे प्रगतिपुस्तक सादर  करण्याचे निर्देश खंडपीठाने  याआधी दिले आहेत. 

मरळवाडी (ता. परळी वैजनाथ) येथील सुग्रीव आंधळे यांनी या प्रकरणी फौजदारी याचिका दाखल केली आहे. गावातील सेवा सहकारी सोसायटीत १६१ बनावट शेतकऱ्यांच्या नावांच्या आधारे ८३ लाख ६६ हजार रुपयांचा अपहार केल्याचा आरोप याचिकेत करण्यात आला आहे. मरळवाडी येथील सोसायटीत आंधळे यांची बनावट सही करून कर्ज प्रकरण मंजूर करण्यात आल्याची माहिती आंधळे यांनी याचिकेत दिली. पत्नीसह त्यांच्या नावावर १ लाख ४६ हजार ९४० रुपयांचे कर्ज उचलण्यात आले.

 १६१ बनावट शेतकऱ्यांच्या नावांच्या आधारे अशीच बोगस प्रकरणे करण्यात आल्याचा आरोपही याचिकेत करण्यात आला आहे. आंधळे यांच्यातर्फे ॲड. संभाजी मुंडे यांनी युक्तिवाद केला. 

गेल्या २३ जानेवारीला सोसायटीचे लेखापरीक्षण करण्यासाठी सहायक निबंधकांना निवेदन देण्यात आलेले आहे. सुनावणीदरम्यान पथकाने तपास अहवाल सादर केला. न्यायालयाने त्याची नोंद घेतली. या प्रकरणात ८ ऑगस्ट रोजी पुढील सुनावणी होईल.