'बिहारमध्ये पर्यटकांसाठी निवास व्यवस्था उभारा'

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 28 मे 2018

औरंगाबाद -  बिहारमधील बुद्धगया, सारनाथ, लुम्बिनी, वैशाली, कुशीनगर अशा पर्यटन स्थळांवर प्रत्येक वर्षी महाराष्ट्रातील बुद्धिस्ट पर्यटक हाजारोंच्या संख्येने येतात. या पर्यटकांसाठी महाराष्ट्र सरकारने निवास व्यवस्था करावी, अशी मागणी भदंत विशुद्धानंद बोधी महाथेरो यांनी पत्रकारांशी बोलताना केली आहे. 

ते म्हणाले, तथागत बुद्धांची ज्ञानभूमी असलेले बुद्ध गया हे ठिकाण जागतिक पातळीवरील श्रद्धास्थान आहे. त्या ठिकाणी चीन, जपान, थायलंड, तिबेट, व्हिएतनाम, कंबोडिया, बर्मा अशा जगभरातील 80 देशांतील बौद्धांनी आपापल्या देशातील येणाऱ्या बुद्धिस्ट पर्यटकांच्या निवासाची व्यवस्था केली आहे. अनेकांनी गया शहर व परिसरात जमीन विकत घेऊन त्यांच्या परंपरेनुसार बुद्धविहार व पर्यटकांच्या राहण्याची व्यवस्था केली आहे. त्या विहारांना त्या-त्या देशांची नावे देऊन ती चांगल्याप्रकारे जोपासली जात आहेत; मात्र या ठिकाणी महाराष्ट्र शासनाने बुद्धिस्ट पर्यटकांसाठी काहीही व्यवस्था केलेली नाही. महाराष्ट्रातून प्रत्येक वर्षी हजारो बुद्धिस्ट पर्यटक बिहार येथे हजेरी लावतात. त्यांच्यासाठी राज्य शासनाने महाराष्ट्र सदन उभारावे. 

Web Title: aurangabad news Build accommodation for tourists in Bihar