शासकीय दंत महाविद्यालयात होणार पाऊणे दोन कोटींची यंत्र खरेदी

योगेश पायघन
सोमवार, 4 सप्टेंबर 2017

प्रशासकीय मान्यता मिळाली : एमडीएसच्या जागा वाढण्यास मिळणार मदत

औरंगाबाद: शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालयाच्या यंत्रखरेदीची रखडलेली प्रशासकीय मान्यता सोमवारी (ता.चार) मिळाली. त्यामुळे यंत्र खरेदीच्या प्रक्रियेला वेग मिळणार आहे. 2017-18 या आर्थिक वर्षासाठी जिल्हा वाषिर्क योजनेतून दोन कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला होता. त्यामधून 1 कोटी 76 लाख 58 हजार 680 रुपयांच्या यंत्रखरेदीच्या प्रस्तावाला डेंटल कॉलेजच्या पाठपुराव्यामुळे सोमवारी प्रशासकीय मान्यता मिळाली.

गेल्या वीस वर्षांपासून रेंगाळलेला दंतव्यंगोपचार शास्त्र, मुखशल्यचिकित्सा शास्त्राच्या पदव्यूत्तर पदवीचा (एमडीएस)  या यंत्रसामुग्रीमुळे सुरु करता येणार आहे. यासाठी लागणारी वातानुकूलित छोटे ऑपरेशन थिएटर तयार आहे. येत्या महिनाभरात डेंटल कॉन्सिल ऑफ इंडियाच्या पथक पाहणी साठी येणार आहे. हि यंत्र आणि उपकरणे लवकर उपलब्ध झाल्यास एमडीएस च्या दोन्ही विभागाला मान्यता मिळू शकते. यामुले प्रत्येकी दोन ते तीन जागा मिळण्याचा मार्ग सुकर होणार आहे. तसेच या यंत्र सामुग्री मुले सध्या सुरु असलेल्या कृत्रिम दंतशास्त्र विषयातील पदव्यत्तर पदवीच्या विषयातील प्रवेश क्षमता तीन वरून सहा होण्यास मदत होणार आहे. अशी माहिती दंत महाविद्यालयाचे डॉ. सुहास खेडगीकर यांनी सकाळ ला दिली.

सुसज्ज ऑपरेशन थिएटर येणार रुग्णसेवेत
जिल्हा वर्षीय योजनेतून मिळालेल्या या यंत्र, उपकरणांमुळे चिकित्सालयीन  उपचार सुलभतेने व जालंदरीत्या करण्यास मदत होणार आहे. मुखशल्य शास्त्र विभागात माध्यम शस्त्रक्रिया करण्यासाठी उभारलेल्या सुसज्ज वातानुकूलित मायनर ओटीमध्ये या उपकरणांना प्रस्तावित करण्यात आले आहे. अशी माहिती दंत महाविद्यालयाचे डॉ. सुहास खेडगीकर यांनी सकाळ ला दिली.

घाटीची यंत्रखरेदी रखडली
दांत महाविद्यालयासोबत शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला 2017-18 या आर्थिक वर्षात जिल्हा वाषिर्क योजनेतून तीन कोटी रुपये मंजूर झाले होते. त्याअनुषंगाने घाटीने चार कोटी दहा लाख रुपयांचा यंत्रखरेदी प्रस्ताव दाखल केला होता. परंतु हा प्रस्ताव राज्य शासनाकडे धूळ खात पडलेला आहे. याकडे घाटी प्रशासन लोप्रतिनिधी व अभ्यागत समितीने पाठपुरवण्याची गरज असल्याचे वैद्यकीय क्षेत्रातील जाणकारांचे मत आहे.

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या : 
सरकारी थकबाकीदार सत्यपाल सिंह मंत्रिमंडळात 
दुर्दैवी अनिता अन्‌ तमीळ अस्मिता...!
धुळे जिल्ह्यात 351 वर्गखोल्या धोकादायक
एकाच कुटूंबातील 3 भावंडांचा तलावात बुडून मृत्यू
मानाच्या बाप्पांचे यंदाही हौदांमध्ये विसर्जन
भाविकांच्या गर्दीने रस्ते दिसेनासे झाले
'व्हेंटिलेटर' आणि 'हाफ तिकीट' सर्वोत्कृष्ट चित्रपट