आमदार चव्हाणांचे बोलणे हा फुसका बार: खैरे 

Chandrakant Khaire
Chandrakant Khaire

औरंगाबाद : खासदार म्हणुन खासदार खैरे निवडुन येणे अशक्‍य आहे, या आमदार सतिष चव्हाण यांच्या वक्तव्याचा समाचार खासदार चंद्रकांत खैरे यांनी सोमवारी (ता.16) घेतला. आमदार चव्हाण यांच्या या वक्तव्यात कोणताही दम नसुन तो निव्वळ फुसका बार असल्याचे प्रत्युत्तर खसादर खैरे यांनी दिले आहे. 

मोदी लाटेत निवडुन आलेले खासदार चंद्रकांत खैरे हे पुन्हा निवडुन येणार नाहीत, असे वक्तव्य राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार सतिष चव्हाण यांनी कले होते. शेंद्रा येथे सोमवारी (ता.16) देवगिरी इेलेक्‍ट्रॉनिक क्‍लस्टरच्या भुमीपुजनाच्या कार्यक्रमानंतर त्यांनी पत्रकारांशी चर्चा केली. औरंगाबाद लोकसभा मतदार संघातुन खासदार चंद्रकांत खैरे हे 2014 साली मोदी लाट असल्याने निवडुन आले होते. आता लोकांची नाराजी असल्याने त्यांना लोकसभेत प्रवेश करणे अवघड असल्याचे वक्तव्य आमदार सतिश चव्हाण यांनी केले होते. या वक्तव्याचा समाचार घेत खैरे यांनी त्यांचे हे बोलणे निव्वळ फुसका बार असल्याचे सांगितले. त्यांना निवडणुक लढवण्याबाबत विचारणा केली असता ते नकार देतात, त्यामुळे त्यांच्या या बोलण्यात काहीही दम नसल्याचे खैरे यांनी सांगितले. आगामी निवडणुकीत आपणच निवडुन येणार का असे विचारले असता, जनतेची सेवा मीच करणार अल्याचे पुन्हा एकदा सांगितले. 

भाजपाला युती करावीच लागेल 
भारतीय जनता पक्ष गेल्या निवडणुकीत मोठ्या बहुमताने निवडुन आला. पण आता पंजाबच्या निवडणुकीत कॉंग्रेसने बाजी मारली आहे. गुजरातमध्येही भारतीय जनता पक्षाची परिस्थिती फार चांगली राहणार नाही. त्यामुळे आगामी निवडणुकांमध्ये भाजपाला "एनडीए' म्हणुनच लढावे लागणार असल्याचे सांगत पुन्हा एकदा युतीचे संकेत खासदार खैरे यांनी दिले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com