जास्तीतजास्त मुलांना जन्म द्या, मी सांभाळेन: साध्वी प्रज्ञासिंह

sadhvi pragya singh
sadhvi pragya singh

औरंगाबाद: देशसेवेसाठी काही नाही करता आले तरी चालेल, मात्र जास्तीत जास्त मुलांना जन्म द्या आणि ती आमच्याकडे द्या, मी त्यांना राष्ट्रभक्त घडवीन, असे आवाहन साध्वी प्रज्ञासिंह यांनी आज (सोमवार) केले. जनूभाऊ रानडे यांच्या दहाव्या स्मृतिदिन, छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमीत्त आयोजित "भगव्या रंग त्यागाचा' या विषयावरील व्याख्यानात त्या बोलत होत्या.

पुढे बोलताना साध्वी म्हणाल्या की, आज भगव्या रंगाला आतंकवादी म्हणून संबोधले जाते. मात्र, भगवा हा समर्पित करणारा, इतरांना प्रेरणा देणारा आहे. सध्या मुलं आत्महत्या करतात, कारण आईबाबांकडे त्याला देण्यासाठी वेळ नाही, त्याला भाऊ बहिणीही नाहीत. संतान उत्पत्ती समाजाच्या उन्नतीसाठी आहे. आध्यात्मिकता हाच देशाचा आत्मा आहे. कार्यक्रमाचे प्रस्ताविक राष्ट्रहित जनाधार विश्‍वस्त मंडळाचे सचिव संजय बारगजे यांनी केले. यावेळी विभाश्री दिदी, शिवाजीराव शेरकर, अमरिश महाराज देगलूरकर, नवनाथ महाराज आंधळे यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती.

ना "मदर' चाहिए, ना "मदरसे'
मिशनरींना विरोध नाही पण ज्या शिक्षणात धर्म, देशप्रेम शिकविले जात नाही, मन, विचार, संस्कार, संस्कृतीला डावलले जाते असे शिक्षणच नको. "मदर' से "मदरसे' बनते है' इसलिए ना मदर चाहिए ना "मदरसे' असे त्या म्हणाल्या. मी जेलमध्ये असताना मला आणि माझी केस लढणाऱ्याला संपविण्यासाठी सुपारी दिली गेली, परंतू मी संपले तरी राष्ट्रभक्ती संपणार नाही, संन्याशाची खरी ताकद आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com