सुंदर ते ध्यान आता मोबाईल वरी!

सुंदर ते ध्यान आता मोबाईल वरी!

जळकोट -  सुंदर ते ध्यान... मोबाईल वरी...! असा अनुभव अलीकडे बच्चेकंपनीकडून येत असून मोठ्यांच्या बालपणीचे जुने खेळ कालबाह्य झाले असून गेले ते दिवस राहिल्या फक्त आठवणी..! अशीच काहीशी स्थिती आहे.

अधूनमधून सोशल मीडियावरही जुने खेळ इतिहासजमा होत असल्याची चर्चा रंगत आहे. तशी संग्रहीत छायाचित्रे टाकली जात आहेत. आधी लहान मुले शाळांना सुट्या लागण्याची वाट पाहात असत. सुट्या कधी सुरू होतील व मामाच्या गावाला कधी जायला मिळेल, या चिंतेत असत. म्हणूनच

‘झुक झुक...आगीन गाडी...धुरांच्या रेषा हवेत काढी....पळती झाडे पाहू या...मामाच्या गावाला जाऊ या....’हे गीत प्रसिद्ध होते. चिमुकल्या तोंडून हे गीत ऐकण्यात वेगळीच गोडी वाटायची. ती जाऊन सुट्या लागताच एक तर ट्युशन क्‍लास, नाहीतर टी.व्ही.वरील तारक मेहता अथवा विविध मालिका नाहीतर मोबाईलवरील गेम आहेतच दिमतीला! अशी स्थिती पहावयास मिळते. जुन्या काळातील सूरपारंबी, गोट्या, विटी-दांडू, शिवनापाणी, काच कवड्या, डफ, मातीचे किल्ले, शूर सरदार, लपाछपी, दोरीवरील उड्ड्या आदी खेळ नामशेष झाले आहेत. तर खो-खो, कबड्डी, कुस्ती, उंच उडी, लांब उडी, धावणे, खुर्ची रेस, लिंबू रेस, थेला रेस, हॉलीबॉल आदी खेळ स्पर्धेपुरते शिल्लक राहिले आहेत. कारण घरी कोणी असे खेळ खेळत नाही. एकतर त्यांना आवड नाही आणि दुसरे टीव्ही, मोबाईलमुळे कोणालाच सवड नाही, अशी स्थिती आहे.

अलीकडे टी.व्ही., मोबाइलच्या जमान्यात शारीरिक व्यायामाकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे पुढे अनेक आजार उद्‌भवू शकतात. जुने खेळ शरीराला कष्ट देणारे, व्यायाम देणारे होते. ते आता बंद झाल्याने अडचण निर्माण झाली आहे. पालकांनी मुलांना मैदानी खेळाकडे वळवावे.
-बाबूराव मोरे, सेवानिवृत्त, क्रीडाशिक्षक

अलीकडे मुले, युवक, तरुण टी.व्ही. व मोबाइलमध्ये मग्न असल्याने ही पिढी वाचनापासून दूर जात आहे. वाचनातून प्रेरणा व ज्ञान मिळते. लहान मुलांना वाचनातून सुसंस्कार मिळतात. जीवनात कसे वागावे हे अनेक गोष्टींत सांगितलेले असते, त्याचा परिणाम मुलांवर होतो. चरित्र व  आत्मचरित्र वाचनातून प्रेरणा मिळते. त्यामुळे धकाधकीच्या जीवनात वाचन महत्त्वाचे ठरते. सुट्यांत तरी वाचनालयाची मैत्री करून द्यावी.
- विलास सिंदगीकर, साहित्यिक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com