'वंदे मातरम्'वरून शिवसेना-भाजप, एआयएम नगरसेवकांत हाणामारी

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 19 ऑगस्ट 2017

सभेच्या सुरवातीला वंदे मातरम् सुरू होरू होताच एमआयएमचे दोन सदस्य उभे न राहता जागेवर बसून राहिले. त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी शिवसेना सदस्यांनी केली. त्याला एमआयएमने विरोध केला व जोरदार घोषणाबजी सुरू झाली. 

औरंगाबाद : वंदे मातरम् वरून आज (शनिवारी) महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत गदारोळ झाला. शिवसेना-भाजप आणि एमआयएमच्या नगरसेवकांमध्ये हाणामारी झाल्याचे पाहायला मिळाले.

वंदे मातरम् म्हणण्यास एमआयएमच्या नगरसेवकांनी विरोध करताच देश मे रहेना होगा तो वंदे मातरम् कहेना होगा अशा एका बाजूने तर दुसऱ्या बाजूने हिंदुस्थान जिंदाबादच्या जोरदार घोषणा सुरू झाल्या. त्यानंतर प्रकरण हातघाईवर आले. माईक तुटले, रेटारेटी झाली. या गोंधळात पोलिसांनी हस्तशेप करत दोन्ही नगरसेवकांना सभागृहाबाहेर काढले. सुमारे तासभर हा गोंधळ सुरू होता. 

सभेच्या सुरवातीला वंदे मातरम् सुरू होरू होताच एमआयएमचे दोन सदस्य उभे न राहता जागेवर बसून राहिले. त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी शिवसेना सदस्यांनी केली. त्याला एमआयएमने विरोध केला व जोरदार घोषणाबजी सुरू झाली.

महापौरांनी दोघांचे सदस्यत्व एका दिवसासाठी निलंबित करत सभा पाच मिनिटांसाठी तहकूब केली. सभा पुन्हा सरू होताच गोंधळ. सभा दुसऱ्यांदा सभा तहकूब करण्यात आली. त्यानंतर दोन्ही नगरसेवक समोरासमोर आले आणि त्याचे रुपांतर हाणामारीमध्ये झाले.

ई सकाळवरील ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा :