अमरप्रीत ग्रुपमध्ये 21 लाखांचा गैरव्यवहार करणाऱ्याच्या कोठडीत वाढ 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 27 ऑक्टोबर 2017

औरंगाबाद - अमरप्रीत ग्रुपमध्ये 21 लाखांचा गैरव्यवहार करणाऱ्या लेखा विभागातील कर्मचाऱ्याच्या पोलिस कोठडीत शनिवार (ता. 28) पर्यंत वाढ करण्याचे आदेश प्रभारी मुख्य न्यायदंडाधिकारी एम. ए. भोसले यांनी दिले. 

औरंगाबाद - अमरप्रीत ग्रुपमध्ये 21 लाखांचा गैरव्यवहार करणाऱ्या लेखा विभागातील कर्मचाऱ्याच्या पोलिस कोठडीत शनिवार (ता. 28) पर्यंत वाढ करण्याचे आदेश प्रभारी मुख्य न्यायदंडाधिकारी एम. ए. भोसले यांनी दिले. 

हॉटेल अमरप्रीत, अवतार मॉटेल्स अँड सिने प्रायव्हेट (लिमिटेड), एपीआय ट्रॅव्हल्स-इव्हेंट-हॉलिडेज या ग्रुपचे लेखाधिकारी राजेंद्र गोपाळराव बोरीकर यांनी या प्रकरणी दिलेल्या तक्रारीनुसार, सातदिवे हा अमरप्रीत ग्रुपच्या लेखा विभागात 2004 पासून संचालक मंडळाच्या बॅंकिंग व्यवहाराचे काम पाहत होता. तसेच दैनंदिन जमाखर्चाच्या हिशेबाची नोंद रजिस्टर व संगणकावर करीत असे; मात्र त्याने केलेल्या व्यवहारांबाबत संस्थेचे संचालक हरप्रीतसिंग यांना शंका आल्याने त्यांनी सातदिवेंकडे विचारणा केली असता सातदिवे समाधानकारक उत्तरे देऊ शकला नाही. याबाबत दाखल करण्यात आलेल्या तक्रारीवरून क्रांती चौक पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाला होता. सातदिवेला मुख्य न्यायदंडाधिकारी एस. बी. पवार यांनी गुरुवार (ता. 26) पर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले होते. गुरुवारी त्याला न्यायालयात हजर करण्यात आले असता शुक्रवार (ता. 27) पर्यंत पोलिस कोठडीत वाढ करण्यात आली.