तीन महिन्यांत अडीच कोटींचा मुद्देमाल जप्त

तीन महिन्यांत अडीच कोटींचा मुद्देमाल जप्त

औरंगाबाद - जिल्ह्यात अवैध धंद्यांना ब्रेक लावण्यासाठी पोलिस अधीक्षक डॉ. आरती सिंह जोरकसपणे मोहीम राबवत आहेत. गत तीन महिन्यांत वाळू माफिया, मटका, जुगार, बोकाळलेल्या अवैध दारू व्यवसायावर जरब बसविला आहे. विशेष पथके स्थापून या कालावधित सुमारे दोन कोटी ५२ लाख ७२ हजार तीनशे दहा रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

ग्रामीण पोलिस अधीक्षक कार्यालयांर्तगत जिल्ह्यातील सर्वच ठाणेप्रमुखांना अवैध धंद्यांविरुद्ध धडक कारवाईचे आदेश अधीक्षक डॉ. आरती सिंह यांनी दिले आहेत. शिवाय विशेष पथके तयार करून अवैध धंद्यांविरुद्ध सतत मोहीम राबविली जात आहे. यातून अवैध धंद्यांवर अंकुश बसविण्यात यश आले आहे. गोदावरी नदीपात्रातून अवैधपणे वाळूचा उपसा, तसेच सर्रास वाहतूक केली जाते. या माफियागिरीला चाप बसविण्यासाठी डॉ. आरती सिंह यांनी मोहीम उघडली आहे. 

गत तीन महिन्यांत यासंबंधी मोठ्या कारवाया पोलिस पथकाकडून झाल्या. यात एकूण वाळूचोरीच्या वीस प्रकरणांत २२ जणांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडून सुमारे दोन कोटी पंचवीस लाख एक हजार रुपयांचा मुद्देमाल पथकांनी जप्त केला. देशी दारूसंबंधित आठ कारवाया करून दहा जणांना ताब्यात घेण्यात आले. यात एकूण तीन लाख ८२ हजार रुपयांची हातभट्टी दारू नष्ट करण्यात आली. तीन ठिकाणी छापे घालून चार गुटखा विक्रेत्यांना पकडण्यात आले. त्यांच्याकडून चौदा लाख ८१ हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या कारवाया डॉ. आरती सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाचे उपनिरीक्षक मनीषा लटपटे, सुनील बोराडे, विष्णू पवार, सुभाष ठोके, गणेश मुसळे यांनी केल्या.

८२ जणांविरुद्ध कारवाई
मटका खेळल्याच्या प्रकरणात बारा कारवाया करून ५२ जणांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडून सहा लाख तीस हजार रुपये, तसेच रेशन धान्याचा काळाबाजार प्रकरण, अंमली पदार्थसंबंधित प्रकरण व कत्तलखान्यासंबंधित अशा प्रत्येकी एक प्रकरणात कारवाया केल्या. एकूण ४७ केसेस करून ८२ जणांविरुद्ध कारवाई करण्यात आली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com