शाळेत गुंडागर्दी करणारे टवाळखोर अटकेत

शाळेत गुंडागर्दी करणारे टवाळखोर अटकेत

औरंगाबाद - दाक्षिणात्य चित्रपटातील गुंडागर्दीचा थरार आता प्रत्यक्षातही पाहण्यास मिळत आहे. शहरातील उस्मानपुरा भागात एका शाळेत चक्क सहा जणांच्या टोळक्‍याने हातात लाठ्या-काठ्या घेऊन विद्यार्थ्यांना मारहाण केली. या प्रकाराने शाळेत खळबळ उडाली. ही घटना बुधवारी (ता. २२) सकाळी अकराच्या सुमारास घडली असून, हा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. 

पोलिसांनी माहिती दिली, की उस्मानपुऱ्यात गुरू तेगबहाद्दूर इंग्रजी स्कूल आहे. तेथे इयत्ता नववीतील दोन विद्यार्थ्यांची आपसात भांडणं झाली. यानंतर एका विद्यार्थ्याने दुसऱ्याला मारहाण करण्यासाठी कोकणवाडीतील सहा तरुणांना लाठ्या-काठ्या, लोखंडी साखळी घेऊन शाळेत बोलावले. यानंतर टोळक्‍याने शाळेत घुसून काही विद्यार्थ्यांचा पाठलाग सुरू केला. त्यामुळे विद्यार्थी वर्गाकडे धावत सुटले. 

वर्गासमोरील एका कोपऱ्यात टोळक्‍याने त्यांना गाठून  दंडुक्‍यासह साखळीने मारहाण सुरू केली. हा प्रकार पाहताच विद्यार्थ्यांची एकच आरडाओरड सुरू झाली. त्यानंतर मुले वर्गातून पटापट बाहेर आली. अचानक मारहाणीच्या प्रकाराने सर्वच भयभीत झाले. यानंतर मध्यस्थी करून शिक्षकांनी या टोळक्‍याची समजूत काढली. त्यानंतर ते शाळेतून निघून गेले. याप्रकरणी शाळेत नोकरीस असलेले जितेंद्र गोविंदराव वाघमारे यांनी तक्रार दिली. त्यानुसार शेख यासीर, अब्दुल गफार चाऊस, शेख इमरान शेख, सगीद, मोईस युनूस मोहम्मद, फिरोजखान हमीद (रा. सर्व कोकणवाडी) यांच्याविरुद्ध धुडगूस घातल्याप्रकरणी गुन्ह्याची नोंद झाली.   

घटना सीसीटीव्हीत कैद
मारहाणीचा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला. त्यानंतर फुटेज हस्तगत केले आहे. त्या आधारे संशयितांविरुद्ध गुन्ह्याची नोंद झाली असून, यानंतर त्यांना अटक करण्यात आली आहे, अशी माहिती पोलिस निरीक्षक दादासाहेब शिनगारे यांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com