औरंगाबादः दमणगंगेचे मराठवाड्याला 50 टीएमसी पाणी

सुषेन जाधव
मंगळवार, 19 सप्टेंबर 2017

मराठवाडा जनता विकास परिषदेच्या पाठपुराव्याला यश

औरंगाबाद : दमणगंगेचे पन्नास टीएमसी (50 अब्ज घनफुट) पाणी गोदावरी खोऱ्यात सोडून ते मराठवाड्याला उपलब्ध करून देण्यासाठी तत्वतः मंजुरी देण्यात आल्याची माहिती मराठवाडा जनता विकास परिषदेचे अध्यक्ष ऍड. प्रदीप देशमुख यांनी दिली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या या घोषणेचे परिषदेतर्फे स्वागत करण्यात आले असून, याची अंमलबजावणी करण्यासाठी सविस्तर प्रकल्प अहवालात त्याचा समावेश करून हे पाणी प्रत्यक्षात मराठवाड्यापर्यंत पोहोचविण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम आखावा, अशीही मागणी केली आहे.

परिषदेतातर्फे नारपार तापी आणि दमणगंगा खोऱ्यातील एकूण 113 टीएमसी पाणी मराठवाड्याच्या हक्काचे आहे हे गुजरातला देण्यात येऊ नये, तर गोदावरी खोऱ्यात सोडावे या मागणीसाठी मागील एक वर्षांपासून पाठपुरावा सुरू होता. मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त मुख्यमंत्री शहरात आले असता ऍड. देशमुख यांनी त्यांची भेट घेत निवेदन दिले होते. यावेळी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, खासदार चंद्रकांत खैरे, आमदार अतुल सावे, संजय केनेकर, डॉ भागवत कराड यांच्यासह नेत्यांची उपस्थिती होती.

शेवटपर्यंत पाठपुरावा सुरूच राहणारः ऍड.  देशमुख
मराठवाड्याला देण्यात येणारे 50 टीएमसी पाणी देण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम आखावा यासाठी आपण नेहमीच पाठपुरावा करणार असल्याचे ऍड. देशमुख म्हणाले. मराठवाड्यासाठी घोषणा होतात मात्र अंमलबजावणी होण्यास उशीर होत असल्याचा आजवरचा अनुभव आहे तो मुख्यमंत्री खोटा ठरवतील, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. 50 टीएमसी व्यतिरिक्त 113 टीएमसी पाण्याबाबतच्या भूमिकेवर आपण ठाम असल्याचेही ऍड. देशमुख यांनी सांगितले.

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या : 

Web Title: aurangabad news Damanganga has 50 TMC water in Marathwada