नोटाबंदीमुळे आर्थिक सुधारणा - दानवे

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 9 नोव्हेंबर 2017

औरंगाबाद - नोटाबंदीचा निर्णय योग्य होता. यामुळे देशाचा फायदा झाला असून, आर्थिक परिस्थितीत सुधारणा झाली आहे, असा दावा भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी केला. नोटाबंदीच्या वर्षपूर्तीनिमित्त बुधवारी दानवे यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली.

दानवे म्हणाले, की नोटाबंदीमुळे देशात डिजिटल व्यवहारात ५८ टक्‍के वाढ झाली असून, ५० लाख नव्या करदात्यांची भर पडली. नोटाबंदीनंतर रिझर्व्ह बॅंकेचा घसरलेला लाभांश, घटलेला विकासदर या विषयावर दानवे यांनी बोलणे टाळले. 