डासांना जन्म घालणारी शहरात डबकी किती? 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 27 सप्टेंबर 2017

औरंगाबाद - नुकत्याच पावसात शहरात जागोजागी पाण्याची तळी साचली आहेत. त्यामुळे येणाऱ्या काळात या डबक्‍यांमध्ये डास उत्पत्ती होऊन नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे आरोग्य विभागाने शहरात किती आणि कुठे कुठे पाण्याची डबकी आहेत, याचा अहवाल प्रभाग कार्यालयांकडून मागविला आहे. 

डासांची उत्पत्ती रोखण्यासाठी महापालिकेकडून धूरफवारणी, ऍबेट ट्रीटमेंट, फॉगिंग केले जाते. दरम्यान, पावसाळ्यात शहरात ठिकठिकाणी पाण्याची डबकी साचलेली आहे. त्यामुळे डासांच्या संख्येत वाढ होण्याची शक्‍यता असून, त्यामुळे डेंगी, मलेरिया यांसारखे आजार बळावण्याचा धोका आहे. त्यामुळे आरोग्य विभाग सतर्क झाला असून, शहरातील डबक्‍यांची माहिती घेण्यास सुरवात केली आहे. महापालिकेच्या सर्व नऊ प्रभाग कार्यालयांना पत्र पाठवून त्यांच्या कार्यक्षेत्रातील पाण्याच्या डबक्‍यांची संख्या किती, याचा अहवाल मागविला आहे. त्यात नेहमीची म्हणजे कायमस्वरूपाची डबकी किती, आता पावसामुळे निर्माण झालेली तात्पुरती डबकी किती, असे वर्गीकरणही करण्यास सांगण्यात आले आहे. हा अहवाल दोन दिवसांत सादर करावा, अशा सूचना आरोग्य विभागाने दिल्या आहेत. त्यानुसार येणाऱ्या काळात ऍबेट ट्रीटमेंट करण्यात येणार असल्याची माहिती आरोग्य विभागाच्या वतीने देण्यात आली. 

टॅग्स