प्रत्येक जिल्ह्यात सायबर सेल असलेले महाराष्ट्र एकमेव राज्य

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 17 सप्टेंबर 2017

मराठवाडा मुक्ती संग्रामदिनी शहरातील वेदांतनगर, पुंडलीकनगर पोलिस ठाण्यांचे उदघाटन समोरोह रविवारी (ता, 17) झाले. त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, खासदार चंद्रकांत खैरे तसेच अन्य लोकप्रतिनिधी व प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.

औरंगाबाद : सायबर गुन्हेगारीला रोखण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात सायबर सेल स्थापन केले असून हि उपलब्धी मिळवणारे  महाराष्ट्र देशात एकमेव राज्य आहे. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी 65 पोलिस ठाण्यांच्या प्रस्तावावर आम्ही सकारात्मक आहोत. अशी माहिती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

मराठवाडा मुक्ती संग्रामदिनी शहरातील वेदांतनगर, पुंडलीकनगर पोलिस ठाण्यांचे उदघाटन समोरोह रविवारी (ता, 17) झाले. त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, खासदार चंद्रकांत खैरे तसेच अन्य लोकप्रतिनिधी व प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.

ते म्हणाले, औरंगाबाद शहरात कायदा व सुव्यवस्था चोख ठेवण्याचे काम पोलिस करीत आहेत. पोलिस विभाग डिजिटल होत असून औरंगाबाद पोलिस ड्रोन कॅमेरा, सीसीटीव्हीवर विशेष काम करीत आहेत. यामुळे गुन्हेगारावर वचक प्राप्त होईल. शहराची गुन्हेगारी घटत आहे ही बाब सकारात्मक असून औरंगाबाद पोलिसांचे अभिनंदन करतो. विशेष पोलिस अधिकारी हि चांगली योजना राबवून पोलिस आयुक्त यशस्वी यादव हे नागरिक व पोलिस यांचे संबध दृढ करीत आहेत. या अभिनव उपक्रमाला यश मिळेल असा विश्वास मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला. या वेळी चिली ड्रोन कॅमेऱ्याचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उदघाटन झाले. तसेच पाच विशेष पोलिस अधिकाऱ्याचा सत्कारही मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आला. 

पोलिस विभागाचे आधुनिकीकरण करण्याचा आपण प्रयत्न करीत आहोत. गृहमंत्री पदाचा भार असल्यापासून पोलिस ठाण्याच्या निर्मितीचे 65 प्रस्तावाबाबत विचाराधीन आहोत. असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.