धनगर समाज आरक्षण मुद्दा भावनिक नाही : जानकर

mahadev jankar
mahadev jankar

औरंगाबाद : धनगर समाजाला आरक्षणाचा मुद्दा भावनिक होऊ शकत नाही तर संवैधानिक आहे. संवैधानिक बाबींची पुर्तता करूनच केंद्राकडे पाठवण्याच्या दृष्टीने राज्य सरकार प्रयत्न करत असल्याचे राज्याचे पशुसंवर्नमंत्री महादेव जानकर यांनी सांगीतले. तसेच धनगरांच्या मुलांनी भटकंती सोडन शिक्षण घेऊन आयएएस, आयपीएस अधिकारी व्हावे, उद्योगधंदे सुरू करून स्पर्धा करण्याचा सल्ला दिला.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र मेंढी व शेळी विकास महामंडळाच्या राजे यशवंतराव होळकर महामेष योजने अतर्गत पडेगाव इथं मेंढपाळांना मेंढ्यांचे गट वाटप करण्यासाठी आज (शनिवार) श्री. जानकर येथे आले होते, यावेळी पत्रकांरांशी संवाद साधताना ते बोलत होते. या योजनेचे हे पहिले वर्ष असून 45 कोटीची तरतुद केली आहे, यात वाढ करून भविष्यात 500 कोटीची तरतुद केली जाईल. धनगर समाजाला आरक्षण देण्याबाबत सरकार सकारात्मक आहे. समाजाचा विकास व्हावा म्हणून ही योजना सुरू केली आहे. समाज सतत शेळ्या मेंढ्यामागे भटकंती करत असतो ही भटकंती थांबून बंदीस्त शेळीपालनाला सरुवात करावी, शिक्षण घ्यावे. जलयुक्त शिवारसारखे चारायुक्त शिवार योजना सुरू करणार असून त्याचा ड्राफ्ट तयार करणे सुरू आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या जनावरांचा चाऱ्याचा प्रश्न सुटेल, दुध उत्पादन वाढेल असा विश्वास व्यक्त केला. राष्ट्रवादीचा हल्लाबोल नैराश्यातुन सुरू असलेला प्रकार असल्याचे मत नोंदवत विरोधक विरोधकाचे काम करत आहेत, आम्ही सत्ताधारी आहोत. सत्ताधाऱ्याचे काम करत असल्याचे सांगीतले.

यावेळी मेंढ्यांच्या 19 गटांचे लाभार्थ्यांना वाटप करण्यात आले, प्रत्येक गटात 20 मेंढ्या आणि 1 मेंढा यांचा समावेश आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com