डॉक्‍टरांना स्वत:तील 'देव' दाखविण्याची गरज 

doctor
doctor

औरंगाबाद, : जीव वाचविण्यासाठी धावा सुरू असतानाच जेथे सर्व आशा मावळतात, तेथे डॉक्‍टरांनाच देवाची उपमा देण्याची परंपरा आहे. मात्र, यांत्रिकीकरणाच्या या काळात झपाट्याने माणसेही बदलत असून, आता शेवटच्या घटका मोजणाऱ्यांना जिवदान देणाऱ्या माणसातील देवाबद्दलही गैरसमज निर्माण झाले आहेत. सबकुछ पैसा यानुसार धावण्याच्या स्पर्धेत देवपण आपण गमावत आहोत का, याचा विचार करण्याची गरज डॉक्‍टरांवर आली आहे. शिवाय, मृत्यूला पलटून लावणाऱ्या डॉक्‍टरांसोबत रुग्णांचे आपुलकीचे नातेही तयार करण्यासाठी रुग्णांनी पुढे येण्याची गरज आहे. 

जिवंतपणी विविध आजारांमुळे होणाऱ्या वेदना कमी, तशाच त्या नाहीशा करण्याचे काम डॉक्‍टर करीत आहेत. अपघातात, अथवा एखाद्या आजाराने मृत्यूच्या दारात उभ्या असलेल्या रुग्णांना पुन्हा नव्याने जीवनदान देण्याचे काम आधुनिक तंत्राच्या माध्यमातून डॉक्‍टर बजावत आहेत. विज्ञानाच्या जोरावरच लोक चंद्रावर जात आहेत. अशक्‍य गोष्टी शक्‍य, साध्य होत आहेत. ही बाब आता गाव, तांड्यावर समजून आहेत. त्यामुळे ग्रामीण भागात काहीही दुखले, की सकवण पाहणे, मंदिरात जाऊन सतत पूजापाठ करणे यांसारख्या अंधश्रद्धेला बळी पडणाऱ्यांची संख्या वेगाने घटली आहे. विज्ञानाने माणसे एकमेकांजवळ आणली. मात्र, मनाने दूर होण्याचे प्रमाण वाढते आहे. माणसाचा माणसांवरचा कमी होत असलेला विश्‍वास आता यंत्राकडे वळला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा हा विश्‍वास माणसाने माणसांवर ठेवावा, अशी स्थिती निर्माण करण्याची गरज आहे. 

गंभीर आजार झाल्यास आता डॉक्‍टरच वाचवू शकतात, अशा भावना रुग्णांसह त्यांच्या नातेवाइकांच्या असतात. मात्र, अनेक शिक्षित रुग्ण एका डॉक्‍टरांनी शस्त्रक्रिया किंवा एखादी उपचार पद्धत सांगितली, की लागलीच दुसऱ्या डॉक्‍टरांकडे सेकंड ओपीनियनसाठी धाव घेत आहेत. केवळ पैशांसाठी आपल्याला शस्त्रक्रिया करून अधू करू नये, अशी त्यामागची धारणा आहे. तशा घटना घडत असल्यानेच रुग्णांचा डॉक्‍टरांवरील विश्‍वास कमी होतो आहे, हे नाकारता येणार नाही. तसेच रुग्ण दगावला, की डॉक्‍टरांना होणारी मारहाण थांबायला हवी, हे प्रमाण सरकारी रुग्णालयात अधिक आहे. त्यामुळे बऱ्याचदा डॉक्‍टर उपचार करण्यासाठी घाबरतात. रुग्ण आणि डॉक्‍टर यांच्यात चांगले नाते निर्माण करण्याची गरज आहे. त्यासाठी सामाजिक संस्थांनीदेखील पुढाकार घ्यायला हवा. तसेच सामाजिक स्वास्थ्य अबाधित राहील, असेच म्हणावे लागेल. 

काळानुसार होणाऱ्या बदल स्वीकारायलाच हवेत. मात्र, माणसांमध्ये नकारात्मक होणारा बदल कुणालाच परवडणारा नाही. कुठल्याही बाबतीत सकारात्मकता आपली ऊर्जा असायला हवी. रुग्णांचा डॉक्‍टरांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलत असला तरी पूर्वीच्या तुलनेत हल्ली अतिशय कठीण प्रसंग बेतलेला असतानाही रुग्णांना बरे करणे, वाचवणे सहज शक्‍य होत आहे. असे असले तरी डॉक्‍टर आणि रुग्ण यांच्यात जिव्हाळ्याचे नाते पूर्वीप्रमाणेच निर्माण करून ते जपायला हवे. 
- डॉ. यशवंत गाडे, अस्थिव्यंगोपचार तज्ज्ञ, औरंगाबाद

ई सकाळवरील ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा -
12 सिंहांच्या गराड्यात तिने दिला बाळाला जन्म
शेतकरी विधवा महिलांनी काढली मुख्यमंत्र्यांची अंत्ययात्रा
मारुतीच्या मोटारी 3 टक्क्यांनी स्वस्त
मेस्सी बालपणीच्या मैत्रिणीसोबत विवाहबंधनात
अनंतनाग: सुरक्षारक्षक व दहशतवाद्यांमध्ये चकमक

पुतनामावशीची कणव
'जीएसटी' देशभरात लागू; संसदेत ऐतिहासिक सोहळा​
'जीएसटी': सामान्य माणसास अल्पकाळ बोचणारा!​
धुळ्यातील शेतकऱ्यांनी कमी खर्चात तयार केले मोटरसायकलचे कोळपे​
धुळे जिल्ह्यात भावी शिक्षकांची 'डीएड'कडे पाठ
असाही एक शिक्षणाच्या भक्तीचा मार्ग (वारीच कोंदण)​
भारताचा विंडीजवर 93 धावांनी विजय; मालिकेत 2-0 ने आघाडी​
‘सीएम’चा ‘पिंपळ’ बकरीने खाल्ला​
'जीएसटी'ला तमाशाचे स्वरूप : राहुल गांधी​

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com