मसापच्या आठव्या लेखिका साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. दिपा क्षीरसागर

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 3 ऑक्टोबर 2017

औरंगाबादः मराठवाडा साहित्य परिषदेच्या (मसाप) आठव्या लेखिका साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी बीड येथील डॉ. दिपा क्षीरसागर यांची निवड करण्यात आली. मसापचे अध्यक्ष प्राचार्य कौतिकराव ठाले-पाटील यांनी ही निवड केली. यावेळी परिषदेचे उपाध्यक्ष प्रा. किरण सगर, कार्यवाह डॉ. दादा गोरे, कोषाध्यक्ष प्रा. भास्करराव बडे, कार्यक्रम समितीचे प्रमुख डॉ. रामचंद्र काळूंखे यांची उपस्थिती होती.

डॉ. क्षीरसागर या बीड येथील केशरकाकू महाविद्यालयाच्या प्राचार्यपदी कार्यरत आहेत. त्यांनी "संत ज्ञानेश्‍वर आणि संत मिराबाई यांच्या मधूराभक्तीपर तौलनिक अभ्यास करुन पीएचडी ची पदवी संपादन केली आहे. "संत ज्ञानेश्‍वर एवं संत मिराबाई की मधूराभक्ती' या हिंदी ग्रंथासह नऊ मराठी पुस्तके त्यांनी लिहली आहेत. त्याशिवाय विविध नियमतालितांतून त्याचे वाडमयीन विषयावर सामाजिक प्रश्‍नांवर प्रबोधनपर लेख प्रसिद्ध झाले आहेत. त्यांच्या "संत ज्ञानेश्‍वर आणि संत मीराबाई यांची मधूराभक्ती' या मराठी संशोधन ग्रंथाला "डॉ. हे. वि. इनामदार संत साहित्य पुरस्कार' मिळालेला असून, इतर वाडमयीन आणि सामाजिक कार्यासाठी विविध संस्थातर्फे दहा पुरस्कार मिळाले आहेत. तसेच नाट्य परिषदेसह इतर 15 साहित्यविषयक संस्थांची जबाबदारी त्यांनी सांभाळली आहे. 2013 मध्ये चौथ्या मराठवाडा लेखिका साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदाची धुरा त्यांनी सांभाळली होती. आहिल्याबाई महिला प्रतिष्ठानतर्फे बीड येथे होणारे मसापच्या आठव्या लेखिका साहित्य संमेलनच्या स्वागताध्यक्षपदी ऍड. उषाताई दराडे असणार आहेत.

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या :