'नवीन कनेक्शनसाठी चकरा माराय लावू नका'

मधुकर कांबळे
शनिवार, 9 सप्टेंबर 2017

महावितरणचे व्यवस्थापकीय संचालक संजीवकुमार यांनी महावितरण वीज कंपनीतील तांत्रीक - अतांत्रीक कर्मचाऱ्यांशी शनिवारी (ता. 9) थेट संवाद साधला. गडचिरोलीपासून कोकणापर्यंत महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रीसिटी वर्कर्स फेडरेशनचे कर्मचारी उपस्थित झाले.

औरंगाबाद : वीज वितरण कंपनी ग्राहकांना सेवा देणारी आहे. कमी दरात, चांगली सेवा मिळाली पाहीजे अन्यथा खाजगी कंपन्या या क्षेत्रात येत असून महावितरणची मक्तेदारी संपुष्टात येण्याचे दिवस दूर नाहीत.

यासाठी काम करण्याची पद्धत बदलावी लागेल, कार्यक्षमता वाढवावी लागेल आणि नवीन ग्राहकांना 3-3 महिने कनेक्शन देण्यासाठी फिरवणे बंद करावे लागणार आहे, असे महावितरणचे व्यवस्थापकीय संचालक संजीवकुमार यांनी आवाहन केले.

महावितरणचे व्यवस्थापकीय संचालक संजीवकुमार यांनी महावितरण वीज कंपनीतील तांत्रीक - अतांत्रीक कर्मचाऱ्यांशी शनिवारी (ता. 9) थेट संवाद साधला. गडचिरोलीपासून कोकणापर्यंत महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रीसिटी वर्कर्स फेडरेशनचे कर्मचारी उपस्थित झाले.

Web Title: Aurangabad news electricity connection