पुंडलिकनगर रस्त्यावरील गणेश मंदिर पाडले

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 30 जुलै 2017

औरंगाबाद - महापालिकेची अनधिकृत धार्मिक स्थळांच्या विरोधातील मोहीम सुरूच असून, शनिवारी (ता. २९) पुंडलिकनगर रस्त्यावर सद्‌भावना गणेश मंदिर जमीनदोस्त करण्यात आले. नागरिकांनी मंदिरासाठी पर्यायी जागेची मागणी करीत कारवाईला काही काळ विरोध केला; मात्र पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर नागरिकांचा विरोध मावळताच आरती करून गणेशाची मूर्ती हटविण्यात आली. दरम्यान, रात्री मंदिराचा गाभारा पोकलेनच्या मदतीने पाडण्यात आला. या वेळी शेकडो नागरिकांचा जमाव जमा झाला होता. 

न्यायालयाच्या आदेशानुसार महापालिका प्रशासनाने शुक्रवारपासून (ता. २८) शहरात अनधिकृत धार्मिक स्थळांच्या विरोधात मोहीम सुरू केली आहे. पहिल्या टप्प्यात रस्त्यांमध्ये बाधित असणारी २३ अतिक्रमणे काढण्याचे नियोजन करण्यात आले आहे. २३ पैकी १५ ठिकाणी शुक्रवारी कारवाई करण्यात आली होती. दरम्यान, शनिवारी महापालिकेची सर्वसाधारण सभा संपताच उपअभियंता वसंत निकम यांच्या नेतृत्वाखालील पथक दुपारी साडेतीन वाजता पुंडलिकनगर भागात पोचले. या ठिकाणी सार्वजनिक रस्त्यावर सद्‌भावना गणेश मंदिर बांधण्यात आले होते. ११०१ अनधिकृत धार्मिक स्थळांच्या यादीत या मंदिराचा समावेश असल्याने मंदिर हटविण्यासाठी पथक येताच नागरिक रस्त्यावर उतरले. आमची वसाहत होण्यापूर्वी या मंदिराची स्थापना करण्यात आली आहे, परिसरातील नागरिकांचे श्रद्धास्थान आहे. मंदिरासाठी पर्यायी जागा देण्यात यावी, कोणाचीही तक्रार नसताना कशासाठी कारवाई करता? असे म्हणत मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष अशोक थोरात, मनोज सोनवणे, अशोक दामले, गीताराम कांबळे, इंद्रजित लांडगे, बापू कवळे, विशाल पुंड यांच्यासह काही महिला विरोध करण्यासाठी पथकाला समोरे गेल्या. न्यायालयाच्या आदेशानुसार कारवाई सुरू आहे. त्यामुळे सहकार्य करा, असे आवाहन महापालिका अधिकाऱ्यांनी केले; मात्र जमाव मागे हटण्यास तयार नसल्याने शेवटी पोलिसांनी हस्तक्षेप केल्यानंतर नागरिकांचा विरोध मावळला. त्यानंतर आरती करून साडेचार वाजेच्या सुमारास गणेशाची मूर्ती हटविण्यात आली. 

मराठवाडा

पूर्णा (परभणी): तालुक्यातील बरबडी येथील लक्ष्मण गणेश सोलव या बावीस वर्षीय अल्पभूधारक शेतकऱ्यांने कर्जबाजारीपणामुळे गळफास घेऊन...

मंगळवार, 19 सप्टेंबर 2017

मराठवाडा जनता विकास परिषदेच्या पाठपुराव्याला यश औरंगाबाद : दमणगंगेचे पन्नास टीएमसी (50 अब्ज घनफुट) पाणी गोदावरी खोऱ्यात सोडून...

मंगळवार, 19 सप्टेंबर 2017

लोहा : बैलगाडा घेऊन शेतीकामाला जात असताना बैलगाडा उलथून झालेल्या अपघातात शेतमजुराचा मृत्यू झाला. ही घटना हिप्परगा गावालगतच्या...

मंगळवार, 19 सप्टेंबर 2017