औरंगाबाद बाजार समितीतील व्यवहार ठप्प

शेखलाल शेख
सोमवार, 5 जून 2017

धान्य मार्केट ही बंद 
औरंगाबाद बाजार समितीमध्ये धान्याची मोठ्या प्रमाणात आवक, विक्री होत मात्र संप असल्याने धान्याच्या गाड्या आल्याच नाहीत. संपामुळे धान्य मार्केट यार्डाला कुलुप लावण्यात आले होते. 

औरंगाबाद - संपामुळे औरंगाबाद कृषी उत्पन्न बाजार समितीमधील फळभाजीपाला मार्केट पुर्णपुणे ठप्प झाले असून सकाळी काही प्रमाणात दुकाना उघडल्यानंतर कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस, शिवसेना, मराठा संघटनांच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी दुकाने बंद केली. त्यामुळे फळभाजीपालासह, धान्य यार्डातील मार्केट शंभर टक्के बंद झाले. 

औरंगाबाद शहराला फळ, भाजीपाला, धान्यांचा औरंगाबाद कृषी उत्पन्न बाजार समितीमधूनच पुरवठा होता. संप असल्याने बहुतांश शेतकऱ्यांनी भाजीपाला आणलाच नव्हता मात्र सकाळच्या सत्रात काही प्रमाणात भाजीपाला विक्री होत असल्याची माहिती मिळताच कॉंग्रेसचे माजी आमदार कल्याण काळे, मराठा संघटनांचे माणिक शिंदे, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख अंबादास दानवे यांनी बाजार समिती येऊन सर्व दुकाने बंद केली. त्यामुळे जे ग्राहक खरेदीसाठी बाजारात आले होत त्यांना माघारी जावे लागले. 

धान्य मार्केट ही बंद 
औरंगाबाद बाजार समितीमध्ये धान्याची मोठ्या प्रमाणात आवक, विक्री होत मात्र संप असल्याने धान्याच्या गाड्या आल्याच नाहीत. संपामुळे धान्य मार्केट यार्डाला कुलुप लावण्यात आले होते. 

शहरात किरकोळ बाजारात भाज्या मिळेना 
बाजार समिती मध्ये भाजीपाल्याची आवक झालेली नसल्याने शहरातील सर्वच किरकोळ भाजीपाला मार्केटमध्ये भाज्यांची टंचाई जाणवण्यास सुरवात झाली आहे. कोणत्या ही भाज्यांची जुडी दहा रुपयांच्या पुढे आहे. भाज्याच नसल्याने मेथीची, कोंथबीरची जुडी पंधरा ते वीस रुपयांना विक्री होत आहे.

ई सकाळवरील ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा -
नाशिकमध्ये वाढली शेतकरी संपाची धग

ज्येष्ठ पत्रकार प्रणव रॉय यांच्या निवासस्थानी छापे
काश्मीर: सीआरपीएफच्या कॅम्पवर हल्ला करणारे 4 दहशतवादी ठार
महाराष्ट्र 'बंद' यशस्वी करण्याचा शेतकऱ्यांचा निर्धार
#स्पर्धापरीक्षा - भारताची संपूर्ण स्वदेशी उपग्रह यंत्रणा 'नाविक'​
भारताचा पाकवर 124 धावांनी दणदणीत विजय​
'दानवेंच्या शेतकऱ्यांसंदर्भातील वक्तव्याचा तपास करा'
मॉन्सूनचे महाराष्ट्रात गुरुवारी आगमन​
मुंबईत भाज्यांच्या किमती भडकल्या