तीन शेतकऱ्यांच्या मराठवाड्यात आत्महत्या 

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 14 नोव्हेंबर 2017

औरंगाबाद - मराठवाड्यात वेगवेगळ्या घटनांत तीन शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. चिवरी (उमरगा, ता. तुळजापूर) येथील शेतकरी मोहन किसन कोळी (वय 50) यांनी घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवारी (ता. 13) सकाळी उघडकीस आली. शेती, मुलीच्या लग्नासाठी घेतलेल्या कर्जाची फेड कशी करावी, या विवंचनेत ते होते, असे सांगण्यात आले. नळदुर्ग पोलिस ठाण्यात घटनेची नोंद झाली. 

नापिकी, कर्जबाजारीपणाला कंटाळून मूर्ती (ता. घनसावंगी, जि. जालना) येथील शेतकरी सचिन मच्छिंद्र गोरे (22) यांनी आज सकाळी साडेआठच्या सुमारास शेतात गळफास घेऊन आत्महत्या केली. ते कापूस वेचणीसाठी गेले होते. वडील शेतात गेल्यानंतर हा प्रकार लक्षात आला. शेतात विष घेतलेल्या हापसापूर (ता. वसमत, जि. हिंगोली) येथील शेतकरी विठ्ठल नारायण सवंडकर (वय 30) यांचा नांदेडच्या एका रुग्णालयात उपचारादरम्यान काल मृत्यू झाला. नापिकी, कर्जाला कंटाळून त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचे त्यांच्या कुटुंबीयांतर्फे सांगण्यात आले. 

Web Title: aurangabad news farmer suicide