खुलताबादच्या काठ शिवरी फाट्यावर बस अडवली

प्रकाश बनकर 
सोमवार, 5 जून 2017

आंदोलनामूळे खुलताबाद-फुलंब्री मार्गावरील वाहतूक अर्धा तास ठप्प 

मराठवाड्‌यातील लातूर विभागात एस.टीच्या बससे सोडणे बंद करण्यात आल्या आहेत.तर उस्मानाबादच्या कळंब तालुक्‍यातील मोहा येथे बसवर दगडफेक करण्यात आली आहेत. कळंब आगारातून एकही बस न सोडण्याचा निर्णय आगार व्यवस्थापकांनी घेतला आहेत.

औरंगाबाद : शेतकऱ्यांच्या आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी खुलताबाद तालुक्‍यातील काठ शिवरी फाट्यावर राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे सोमवारी(ता.5)रस्ता रोखो करण्यात आला.यामूळे औरंगाबाद-बोडखा ही बस तब्बल आर्धा तास थांबवून ठेवण्यात आली होती.या बससही इतर खुलताबाद-फुलंब्री मार्गावरील वाहतूक काही काठ ठप्प झाली होती. 

राज्यात शेतकऱ्यांचा संप सुरु आहे. सोमवारी शेतकऱ्यांतर्फे महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली.याला पाठिंबा देण्यासाठी विविध राजकीय पक्ष पुढे आले आहेत. या माध्यामतून राज्यातील अनेक मार्गावरील बसगाड्या थांबविण्यात आल्या आहेत. मराठवाड्‌यातील लातूर विभागात एस.टीच्या बससे सोडणे बंद करण्यात आल्या आहेत.तर उस्मानाबादच्या कळंब तालुक्‍यातील मोहा येथे बसवर दगडफेक करण्यात आली आहेत. कळंब आगारातून एकही बस न सोडण्याचा निर्णय आगार व्यवस्थापकांनी घेतला आहेत.

याच पार्श्‍वभूमीवर औरंगाबाद विभागातही सर्तकता बाळगण्यात येत आहेत. खुलताबाद येथे सकाळी 10.55 वाजता ही बस अडविण्यात आली. पोलिस आल्यानंतर सकाळी 11.20 वाजता ही बस व इतर वाहतूक सुरळीत करण्यात आली आहेत. कळंब च्या पर्श्‍वभूमीवर औरंगाबाद विभागातील सर्वच आगारामध्ये सर्तकता बाळगण्याचे आदेश विभागीय कार्यालयातर्फे देण्यात आले आहेत.