प्रोझोन मॉलमधील पार्कींग एजन्सीच्या विरोधात गुन्हा दाखल

मनोज साखरे
गुरुवार, 7 सप्टेंबर 2017

पार्कींग शुल्काची अनधिकृत आकारणी

औरंगाबाद : प्रोझोन मॉल (इंपेरियल मॉल) मधील पार्कींग शुल्क वसूल करणाऱ्या एजन्सीच्या विरोधात अनधिकृत पार्किंग शुल्क वसुली केल्याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

पार्कींग शुल्काची अनधिकृत आकारणी

औरंगाबाद : प्रोझोन मॉल (इंपेरियल मॉल) मधील पार्कींग शुल्क वसूल करणाऱ्या एजन्सीच्या विरोधात अनधिकृत पार्किंग शुल्क वसुली केल्याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

शहरातील सर्वात मोठ्या प्रोझोन मॉलमध्ये सुरवातीला पार्कींग शुल्क आकारणी होत नव्हती, मात्र गेल्या काही वर्षापासून मॉलमध्ये वीस ते पंचवीस रुपये पार्कींग शुल्क वसुल करणे सुरु केले होते. या विरोधात नागरीकांनी पोलिस आयुक्त यशस्वी यादव यांच्याकडे तक्रारी केल्या होत्या. या तक्रारीच्या अनुशंगाने पोलिस उपनिरिक्षक श्रीकातं नवले यांनी चौकशी केली. त्यावेळी प्रोझोन मॉलने पार्कींग वसुलीसाठी सेक्‍युअर पार्कींग सोल्युशन प्रा. लि. यांच्याबरोबर करार केल्याचे आढळून आले. वास्तविक पहाता पार्कींग एजन्सीला अशा प्रकारचा कुठलाही अधिकार नाही. ग्राहकांना दिल्या जाणाऱ्या पावतीवर वसुल करणाऱ्याचे नाव नाही, जीएसटी क्रमांकही नाही. त्यामुळे श्रीकांत नवले यांनी सिडको एमआयडीसी पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार एजन्सीच्या विरोधात फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेचे सहाय्यक निरिक्षक ए. व्ही. सातोदकर यांच्याकडे देण्यात आला. शहरातील अन्य अनाधिकृत पार्कींगच्या विरोधातही असेच गुन्हे दाखल करणार असल्याचे पोलिसांनी सांगीतले.

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या :
पाकसोबत मैत्री केल्यास काश्‍मीरमध्ये शांतता नांदेल - अब्दुल्ला
महिलेच्या अवयवदानामुळे चार जणांना जीवदान
गिरीश महाजनांचा ठेका अन्‌ पोलिस निरीक्षकाची दौलतजादा ! 
माझ्यावर आरोप करण्यात काहींना आनंद वाटतो - खडसे
गुजरात सरकारची 'ब्लू व्हेल'वर बंदी
जुहू येथील इमारतीला आग; पाच जणांचा मृत्यू
ठाणे: कळव्यात महिला पोलिस कॉन्स्टेबलची आत्महत्या
जनसागर लोटला
दोन्ही देशांचे हित एकातच : नरेंद्र मोदी
गणेश विसर्जनादरम्यान राज्यात 16 जणांचा मृत्यू
ब्रॅण्डबाजा! (ढिंग टांग!)

टॅग्स