भाविकांसाठी सुरू केले अन्नछत्र

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 25 सप्टेंबर 2017

दरवर्षीप्रमाणे याही वर्षी कर्नाटकातील भाविकांची जेवण व निवास व्यवस्था केली आहे. दररोज दोन हजारपेक्षा जास्त भाविक लाभ घेत आहेत.
- सतीश देवणे

औराद शहाजानी - कर्नाटकातून पायी येणाऱ्या भाविकांसाठी महाराष्ट्रायीन भाविकांकडून अन्नछत्राची व्यवस्था करण्यात आली आहे. 

तुळजापूर येथील भवानीमातेच्या दर्शनासाठी हजारो भाविक पायी जात असतात. यासाठी औराद व परिसरातील नागरिक या भाविकांसाठी अल्पोपाहार, जेवण व रात्रीच्या निवासाची सोय करीत असतात.यात बसवकल्याण, भालकी, बिदर, औराद बाऱ्हाळी तालुक्‍यातील भाविक मोठ्या प्रमाणात येतात. यात पायी जाऊन नवस फेडणाऱ्या भाविकांची संख्या जास्त आहे. यातील भाविक अनवाणी पायाने जाऊन दर्शन घेत असतात. औराद परिसरातील सतीश देवणे, गणपतराव गणापुरे विनोदकुमार डोईजोडे, लक्ष्मण सांडवे यांनी अन्नछत्राचा उपक्रम सुरू केला आहे.