बावीस वर्षीय तरुणीवर चौघांचा बलात्कार

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 4 नोव्हेंबर 2017

चिकलठाणा विमानतळाजवळ शनिवारी सकाळी आक्षेपार्ह्य अवस्थेत तरुणी आढळून आली. पोलिसांनी तिला घाटीत उपचार करण्यासाठी हलवले. उपचारानंतर तिच्या जबाबवरून रात्री उशिरा एम सिडको पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला.

औरंगाबाद : मुकुंदवाडी भागातील 22 वर्षीय युवतीला दारू पाजून शेंद्रा परिसरात चौघांनी सामूहिक बलात्कार केल्याची घटना आज (शनिवारी) सकाळी उघडकीस आली.

चिकलठाणा विमानतळाजवळ शनिवारी सकाळी आक्षेपार्ह्य अवस्थेत तरुणी आढळून आली. पोलिसांनी तिला घाटीत उपचार करण्यासाठी हलवले. उपचारानंतर तिच्या जबाबवरून रात्री उशिरा एम सिडको पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला. हद्दीमुळे घटना ग्रामीण चिकलठाणा पोलिसांकडे वर्ग करण्यात आली आहे.

पुढील तपास पोलिस करीत असून शहरात सामुहिक अत्याचाराची घटना घडल्याने एकच खळबळ उडाली आहे. या घटनेतील मुख्य आरोपीला पोलिसांनी अटक केल्याची माहिती सूत्रांनी दिली.